मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Naatu Naatu: ‘नाटू नाटू’ गाण्यावर आनंद महिंद्रा यांचा डान्स, राम चरणने शिकवल्या स्टेप Video Viral

Naatu Naatu: ‘नाटू नाटू’ गाण्यावर आनंद महिंद्रा यांचा डान्स, राम चरणने शिकवल्या स्टेप Video Viral

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 12, 2023 10:34 AM IST

Anand Mahindra: सध्या सोशल मीडियावर आनंद महिंद्रा आणि राम चरण यांचा नाटू नाटू गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आनंद महिंद्रा
आनंद महिंद्रा (HT)

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले होते. तसेच या गाण्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले. आता 'नाटू नाटू' या गाण्यावर आनंद महिंद्रा आणि राम चरण यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. नुकताच त्यांनी १६ सेकंदाचा राम चरणसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राम चरण आनंद यांना 'नाटू नाटू' गाण्याची हूक स्टेप शिकवताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: बिचारा आमिर खान; कंगना रणौतने यूजर्सच्या व्हिडीओवर दिली प्रतिक्रिया

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करत, 'शर्यती शिवाय #HyderabadEPrixचा खरा बोनस म्हणजे राम चरणकडून नाटू नाटू गाण्याची हूक स्टेप शिकणे. खूप खूप आभार आणि ऑस्करसाठी शुभेच्छा मित्रा' या आशयाचे ट्वीट केले आहे.

‘आरआरआर’ या चित्रपटातील 'नाटू नाटू' हे गाणे जगभरात खूपच गाजले आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटात साऊथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली आहेत. नाटू नाटू या गाण्याने गोल्डन ग्लोब हा पुरस्कार जिंकला आहे. त्यानंतर या चित्रपटाला देखील ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळाले आहे.

IPL_Entry_Point

विभाग