मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amanda Cerny Nude Video: रणवीरला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच नग्न झाली मॉडेल

Amanda Cerny Nude Video: रणवीरला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच नग्न झाली मॉडेल

Payal Shekhar Naik HT Marathi
Aug 02, 2022 12:50 PM IST

न्यूड फोटो प्रकरणावर रणवीरने (ranveer singh nude photoshoot)अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण दरम्यान, अभिनेत्री आणि मॉडेल अमांडा सेर्नीचा (amanda cerny)एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका शॉपिंग मॉलमध्ये नग्न अवस्थेत दिसत आहे

अमांडा सेर्नी
अमांडा सेर्नी

(amanda cerny viral nude video)बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे वादात सापडला आहे. रणवीरवर एफआयआर दाखल करण्यात आला असतानाच दुसरीकडे इंदौरमध्ये अभिनेत्यासाठी कपडे दान करण्यात आले असून, त्याचं फोटोशूट मानसिक कचरा असल्याचं म्हटलं आहे. या सर्व वादांवर रणवीरने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, अभिनेत्री आणि मॉडेल अमांडा सेर्नीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका शॉपिंग मॉलमध्ये कपड्यांशिवाय दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अमांडाचा व्हायरल व्हिडिओ

अमांडाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका शॉपिंग मॉलमध्ये दिसत आहे. अमांडा फोनवर बोलत आहे आणि नंतर फोन डिस्कनेक्ट करते, तिचे सर्व कपडे काढते आणि नंतर शॉपिंग मॉलच्या वेगवेगळ्या भागात पोझ देते. अमांडाच्या या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंड ऑडिओही ऐकू येत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं, 'रणवीर सिंगला न्याय?'

अमांडा सेर्नी कोण आहे?

अमांडाची चर्चेत रायेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तेव्हाही ती चर्चेत होती. अमांडा अमेरिकेच्या पेनसिल्वेनियामधील पिट्सबर्ग येथील रहिवासी आहे आणि ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अमांडाच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अमांडा प्लेबॉय मॅगझिनची मॉडेलही होती. अमांडाचे इंस्टा वर २३. ८ मिलियन फॉलोअर्स आहेत. अमांडा तिच्या फिटनेस आणि कर्वी फिगरसाठी ओळखली जाते आणि चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओंवर भरभरून कमेंट करतात. अमांडा एक युट्यूबर देखील आहे आणि तिच्या चॅनेलवर सुमारे ३० लाख स्बस्क्राइबर्स आहेत. ती अभिनेत्री जॅकलिन फ़र्नांडीझची मैत्रीण आहे.

IPL_Entry_Point

विभाग