मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Akshay Kumar: अक्षयची कमाल! ३ मिनिटांत 'असे' सेल्फी घेत मोडला गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

Akshay Kumar: अक्षयची कमाल! ३ मिनिटांत 'असे' सेल्फी घेत मोडला गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 23, 2023 10:05 AM IST

Guinness World Record: अक्षय कुमारने ३ मिनिटांत १८४ सेल्फी घेत नवा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

अक्षय कुमार
अक्षय कुमार (HT)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. लवकरच अक्षयचा सेल्फी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अक्षयने ३ मिनिटात सर्वाधिक सेल्फी घेत गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. हो तुम्ही बरोबर ऐकले. अक्षयने २२ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत हा नवा रेकॉर्ड केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अक्षय सध्या त्याच्या आगामी चित्रपट सेल्फीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान त्याने २२ फेब्रुवारी रोजी मुंबईत एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात त्याने चाहत्यांशी संवाद साधला. त्याचवेळी १८४ चाहत्यांसोबत सेल्फी घेत अक्षयने नवा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. अक्षयने हा रेकॉर्ड कसा मोडला याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: बालकवींच्या 'या' कवितेचा वापर 'फुलराणी' चित्रपटात, पाहा व्हिडीओ…

अक्षयने हा व्हिडीओ शेअर करत, 'मी आजपर्यंत जे की कमावले आहे आणि जीवनात ज्या टप्प्यावर पोहोचलो आहे ते फक्त माझ्या चाहत्यांच्या प्रेमामुळे. माझ्या चाहत्यांच्या मदतीने ३ मिनिटात सर्वाधिक सेल्फी घेण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही तोडला आहे. तुम्हा सगळ्यांचे आभार. माझ्या आयुष्यातील हे खास क्षण होते आणि मला ते कायम लक्षात राहतील. आता सेल्फीच सेल्फी असतील' या अशयाचे कॅप्शन दिले आहे.

अक्षयच्या सेल्फी या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात इम्रान हाश्मी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहताने केले. यापूर्वी त्याने अक्षय सोबत 'गूड न्यूज' हा चित्रपट केला होता. अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा हा चित्रपट मल्याळम 'ड्रायविंग लायसेन्स' या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात इम्रान आणि अक्षयसोबत नुसरुत भरुचा आणि डायने पेंटी दिसणार आहे. हा चित्रपट २४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता अक्षयचा हा चित्रपट तरी चालणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IPL_Entry_Point

विभाग