मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अजय पुरकर यांनंतर आणखी एका अभिनेत्रीने केला 'मुलगी झाली हो' ला रामराम

अजय पुरकर यांनंतर आणखी एका अभिनेत्रीने केला 'मुलगी झाली हो' ला रामराम

Payal Shekhar Naik HT Marathi
Apr 16, 2022 12:53 PM IST

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'मुलगी झाली हो' पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे.

श्वेता अंबिकर
श्वेता अंबिकर

छोट्या पडद्यावरील मालिका 'मुलगी झाली हो' पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. गेले काही महिने ही मालिका सतत प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. मालिकेतील अभिनेते किरण माने यांना अचानक मालिकेतून काढून टाकल्याने ही मालिका प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर मालिकेतील कलाकार अजय पुरकर यांनी मालिका सोडत असल्याची पोस्ट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांच्यापाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने ही मालिका सोडल्याच्या चर्चा आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

'मुलगी झाली हो' ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत होता मंत्रच मालिकेचा ट्रॅक भरकटल्याने मालिकेचा टीआरपी कमी झाला. त्यानंतर मालिका संपणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र मालिका रात्री ऐवजी दुपारी दाखवणार असल्याचं सांगत निर्मात्यांनी या चर्चांना पूर्ण विराम दिला. त्यानंतर अजय पुरकर यांनी मालिकेचा निरोप घेतला. आता मालिकेत आर्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता अंबिकर हिनेदेखील मालिकेचा निरोप घेतला आहे.

श्वेताने मालिका का सोडली यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र मालिकेतील कलाकार बदलत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधी दिव्या त्यानंतर किरण माने मग साजिरींची बहीण मग अजय पुरकर त्यानंतर आता आर्या. यामुळे मालिका पाहण्याचं कारणचं उरत नसल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत.

IPL_Entry_Point