मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aditya Chopra: आदित्य चोप्राच्या ‘त्या’ एका सल्ल्यानं हिट ठरला 'हम आपके हैं कौन'

Aditya Chopra: आदित्य चोप्राच्या ‘त्या’ एका सल्ल्यानं हिट ठरला 'हम आपके हैं कौन'

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 16, 2023 02:47 PM IST

Hum Apke Hai kaun: 'द रोमॅंटिक्स' या डॉक्यू-सीरिज आदित्य चोप्राने हा खुलासा केला आहे.

हम आपके है कौन
हम आपके है कौन (HT)

बॉलिवूडमधील असे काही चित्रपट आहेत जे प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली आहेत. मात्र प्रेक्षक आजही ते तितक्याच आनंदाने आणि आवडीने पाहातात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'हम आपके है कौन.' या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास २६ वर्षे उलटली आहेत. त्यानंतर आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आदित्य चोप्राने चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'द रोमॅंटिक्स' ही एक डॉक्यू-सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये दिवंगत यश चोप्रा आणि त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी दाखवण्यात येणार आहेत. या सीरिजमध्ये आदित्य चोप्रा दिग्दर्शक सूरज बडजात्याच्या 'हम आपके है कौन' या चित्रपटाविषयी बोलताना दिसत आहे. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला असून हिट ठरला होता. आदित्यच्या एका सल्ल्याने हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
वाचा: सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्ये केलं किस, कोण आहे भूमी पडणेकरचा बॉयफ्रेंड?

जेव्हा या चित्रपटाचे इंडस्ट्रीमधील अनेकांसाठी स्क्रीनिंग झाले तेव्हा जवळपास सर्वांनी नकारात्मक फिडबॅक दिला होता. ते ऐकून सूरज बडजात्या नाराज झाले होते. आदित्य चोप्राने फोन करुन सूरजयांना सल्ला दिला. 'सूरज चित्रपट चांगला आहे. तुम्ही काळजी करू नका. फक्त चित्रपटातील काही गाणी कमी कर' असे सूरज म्हणाला. सूरज यांनी तसेच केले. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो सुपरहिट ठरला.

'हम आपके है कौन' या चित्रपटात सलमान खान, माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, अनुपम खेर, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा एक फॅमिली ड्रामा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाला पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.

IPL_Entry_Point

विभाग