मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hruta Durgule: ‘फुलपाखरू’ हृता दुर्गुळे ठरली महाराष्ट्राची फेव्हरेट; पटकावला ‘पॉप्युलर फेस ऑफ द इअर’

Hruta Durgule: ‘फुलपाखरू’ हृता दुर्गुळे ठरली महाराष्ट्राची फेव्हरेट; पटकावला ‘पॉप्युलर फेस ऑफ द इअर’

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 27, 2023 10:41 AM IST

Maharashtracha Favourite Kon: छोट्या पडद्यावरून पदार्पण करत मोठी प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री हृता दुर्गळे सरत्या वर्षात मोठ्या पडद्यावरही झळकली. तिने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली.

Hruta Durgule
Hruta Durgule

Maharashtracha Favourite Kon: केवळ मालिका विश्वच नव्हे, तर चित्रपट आणि नाटक या माध्यमातून देखील हृताने प्रेक्षकांचे मन जिंकले. आता हृताला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी ‘पॉप्युलर फेस ऑफ द इअर’ हा किताब दिला आहे. छोटा पडदा, मोठा पडदा, रंगभूमी, सोशल मीडिया अशा प्रत्येक स्क्रिनवर हृताने सिक्सर मारला आहे. त्यात आता ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यात ‘पॉप्युलर फेस ऑफ द इअर’चा किताब हृताने पटकावला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

छोट्या पडद्यावरून पदार्पण करत मोठी प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री हृता दुर्गळे सरत्या वर्षात मोठ्या पडद्यावरही झळकली. सोशल मीडियावर नेहमीच हिट असलेल्या हृताची टीव्ही मालिकेतील प्रतिमा अतिशय सोज्वळ, समजूतदार नायिका अशी आहे. हृताने ‘टाइमपास ३’ या पहिल्याच सिनेमात साकारलेल्या टपोरी गर्ल ‘पालवी’ने अक्षरश: धमाल केली. ‘दुर्वा’ या मालिकेतून तिने अभिनयाला सुरूवात केली होती. ‘फुलपाखरू’, ‘मन उडू उडू झालं’ या तिच्या मालिकाही गाजल्या. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकातूनही ती प्रेक्षकांना आवडली. ‘अनन्या’ आणि ‘टाइमपास ३’ या सिनेमाने हृताला घराघरात पोहोचवलं.

इन्स्टाग्रामवर २५ लाख फॉलोअर्स असलेली हृता ही एकमेव मराठी अभिनेत्री आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये हृताची स्टाईल फॉलो केली जाते. या पुरस्काराबद्दल बोलताना हृता सांगते, ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्याचे हेच वैशिष्ट्य आहे की, हा पुरस्कार ज्या कलाकाराच्या हातात असतो, त्या कलाकाराला प्रेक्षकांनी त्यांचं मत दिलेलं असतं. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांकडून मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी नक्कीच खूप जवळचा ठरला आहे. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून मिळलेली पुरस्काराची भेट आयुष्यभर एक स्पेशल पुरस्कार बनून राहील.’

मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा घेऊन यावर्षी पुन्हा एकदा झी टॉकीज ही वाहिनी रसिकांच्या भेटीला आली. गेल्या वर्षभर प्रदर्शित झालेल्या सिनेमांमधून विविध बारा विभागासाठी हे पुरस्कार देण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा फेव्हरेट ‘पॉप्युलर फेस ऑफ द इअर’, ‘फेव्हरेट अभिनेता’, ‘अभिनेत्री’, ‘खलनायक’, ‘सहाय्यक अभिनेता’, ‘सहाय्यक अभिनेत्री’, ‘फेव्हरेट सिनेमा’, ‘गायक’, ‘गायिका’, ‘गाणं’, ‘संगीतकार’, ‘दिग्दर्शक’ आणि ‘स्टाईल आयकॉन’ अशा विभागांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या कलाकारांमधून प्रेक्षकच त्यांच्या पसंतीची मोहर उमटवत असतात. त्यामुळे कलाकारांनाही हा सन्मान म्हणजे प्रेक्षकांच्या पसंतीची पावतीच असते.

IPL_Entry_Point