मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Charcha Tar Honarach: परदेशी पाहुण्यांनाही मराठी नाटकाची भुरळ! अमेरिकेपासून ते दुबईपर्यंत ‘चर्चा तर होणारच’

Charcha Tar Honarach: परदेशी पाहुण्यांनाही मराठी नाटकाची भुरळ! अमेरिकेपासून ते दुबईपर्यंत ‘चर्चा तर होणारच’

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 22, 2022 01:27 PM IST

Charcha Tar Honarach: मराठी रंगभूमीवरील ‘चर्चा तर होणारच’ या नाटकाने प्रेक्षकांना खडबडून जागं केलं आहे. अगदी परदेशातही या चर्चेची दखल घेतली आहे.

Charcha Tar Honarach
Charcha Tar Honarach

Charcha Tar Honarach: राजकीय आणि सामाजिक वक्तव्यावरून घडणाऱ्या चर्चा याचे उलट सुलट प्रतिबिंब समाजात उमटत असते. कित्येकदा या चर्चा सामजिक जीवनात गदारोळ माजवणाऱ्या ठरल्या आहेत. वेगवेगळ्या चर्चांनी सध्या देशातील वातावरण चांगलंच गढुळलेलं आहे. सगळीकडे सध्या ‘बॉयकॉट’ची चर्चा सुरू असताना मराठी मनोरंजन विश्वातून मात्र आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या मराठी रंगभूमीवरील तर नाटकाची परदेशातही मोठी चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर या नाटकाच्या प्रयोगासाठी आता परदेशातून आमंत्रण देखील आले आहे.

मराठी रंगभूमीवरील ‘चर्चा तर होणारच’ या नाटकाने प्रेक्षकांना खडबडून जागं केलं आहे. अगदी परदेशातही या चर्चेची दखल घेतली आहे. अदिती सारंगधर, आस्ताद काळे, आणि क्षितिज झारापकर या त्रयीचं ‘चर्चा तर होणारच’ या नाटकाच्या प्रयोगांना परदेशातील नाट्य रसिकांकडून नाटकाच्या प्रयोगासाठी खास आवताण देण्यात आलं आहे. अमेरिका, सिंगापूर, दुबई येथील महाराष्ट्र मंडळाकडून हे आमंत्रण देण्यात आलं आहे. नाटकाचे अधिकाधिक प्रयोग परदेशात व्हावे अशी इच्छा परदेशातील नाट्यरसिक व्यक्त करत आहेत.

परस्पर विचारसरणीच्या विरोधात दंड थोपटून उभ्या असलेल्या दोन कार्यकर्त्यांची गोष्ट या नाटकात मांडण्यात आली आहे. एका सामाजिक पुरस्काराच्या निमित्ताने मुद्दाम उकरल्या गेलेल्या वैचारिक जुगलबंदीत कोण, कसे डावपेच खेळतात याची रंगतदार मांडणी केलेलं नाटकं म्हणजे ‘चर्चा तर होणारच!’ लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांनी ‘चर्चा तर होणारच!’ या नाटकाद्वारे सद्य: परिस्थितीवर भाष्य करत घडवून आणलेली चर्चा विचारमंथन करायला भाग पाडते. अदिती सारंगधर, आस्ताद काळे, आणि क्षितिज झारापकर यांनी आपल्या सशक्त अभिनयाने या नाटकाला चारचाँद लावले आहेत.

रंगनील व वेद प्रॉडक्शन्स निर्मित आणि आर्या व्हिजन प्रस्तुत ‘चर्चा तर होणारच!’ हे नाटक सध्या तुफान गाजतंय. मुंबई पुण्यातल्या प्रयोगांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. लवकरच कोकण दौरा आयोजित केला जाणार आहे.

IPL_Entry_Point