मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: अनघासमोर उभं ठाकणार मोठं संकट; ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवे वळण!

Aai Kuthe Kay Karte: अनघासमोर उभं ठाकणार मोठं संकट; ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवे वळण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 31, 2022 01:27 PM IST

Aai Kuthe Kay Karte: अनघाने आपल्या लेकीला घेऊन काही दिवस माहेरी जाण्याचा विचार केला होता. मात्र, ती घराबाहेर गेली तर, पुन्हा घरात कधीच परत येणार नाही, अशी भीती संजनाने कांचनच्या मनात निर्माण केली आहे.

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत सध्या नात्यांमधील भावनिक गुंतागुंत पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा देशमुख कुटुंबासमोर एक मोठं संकट उभं ठाकणार आहे. एका मुलाचा संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर आता दुसऱ्या मुलाचा संसार तुटू नये यासाठी सगळेच देशमुख शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, आता त्यांना आणखी एका अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पत्नी अनघा गर्भवती असताना अभिषेक बाहेर एका दुसऱ्या मुलीसोबत फिरत होता. हे पाहून अरुंधती चांगलीच संतापली होती. तिने घरात सर्वांसमोर अभिषेकची कान उघडणी केली होती. यावेळी घडलेला सगळा प्रकार अनघाला देखील कळला होता. याने तिला मोठा धक्का बसला होता. अरुंधतीच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना आता तिची सून अनघा हिच्यासोबत घडताना दिसत आहेत. आता अरुंधती आपल्या सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असून, तिच्या प्रत्येक निर्णयात साथ देणार आहे.

आता अनघाने आपल्या लेकीला घेऊन काही दिवस माहेरी जाण्याचा विचार केला होता. मात्र, ती घराबाहेर गेली तर, पुन्हा घरात कधीच परत येणार नाही, अशी भीती संजनाने कांचनच्या मनात निर्माण केल्याने आता अनघा घराबाहेर जाऊ नये यासाठी कांचन योजना आखत आहे. मात्र, कुठल्याही परीस्थित मी माझेरी जाणारच असा ठाम निर्णय अनघाने केला होता. तर, अरुंधती आणि यश देखील तिच्या या निर्णयात तिच्यासोबत होते. यावेळी घरात वाद सुरु असतानाच अनघाचे वडील घरी आले.

अभि आणि अनघाच्या आयुष्यात आलेल्या वादळाबद्दल कळताच प्रदीपराव आजारी पडले होते. अशा स्थितीत त्यांनी प्रवास करू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. वडिलांना येत येणार नसल्याने अनघा स्वतः गावी जाऊन त्यांना नातीचा चेहरा दाखवणार होती. मात्र, आता प्रदीपरावांच्या अचानक येण्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. तर, प्रदीपरावांनी घरात येताच आपल्या नातीची भेट घेतली. यानंतर त्यांनी अभिषेकला देखील चांगलेच फैलावर घेतले. यावेळी त्यांनी आपण अनघाला आणि आपल्या नातीला कायमचे गावी घेऊन जात असल्याचे म्हटले आहे. आता अनघाला यावर निर्णय घ्यावा लागणार आहे. मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.

IPL_Entry_Point