Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला मतदान करा; विचारवंत, साहित्यिकांसह ८० संघटनांचं मतदारांना आवाहन-writers thinkers and various organisations appeal people to vote for maha vikas aghadi ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला मतदान करा; विचारवंत, साहित्यिकांसह ८० संघटनांचं मतदारांना आवाहन

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला मतदान करा; विचारवंत, साहित्यिकांसह ८० संघटनांचं मतदारांना आवाहन

Apr 25, 2024 09:29 AM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरोगामी विचारांचे लेखक, पत्रकार व सामाजिक संघटनांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला असून मतदारांनाही आवाहन केलं आहे.

महाविकास आघाडीला मतदान करा; विचारवंत, साहित्यिकांसह ८० संघटनांचं मतदारांना आवाहन
महाविकास आघाडीला मतदान करा; विचारवंत, साहित्यिकांसह ८० संघटनांचं मतदारांना आवाहन (PTI)

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच विविध राजकीय पक्षांच्या विचारांशी नातं सांगणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक संघटनाही सक्रिय झाल्या आहेत. महाविकास आघाडीसाठी काही लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते व सुमारे ८० वेगवेगळ्या संघटना मैदानात उतरल्या आहेत. महाविकास आघाडीला मतदान करा, असं आवाहन या सर्वांनी मतदारांना केलं आहे.

वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी आणि इतर काही पक्षांनी जे उमेदवार उभे केले आहेत, त्यामुळं मत विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. ते टाळण्यासाठी सजग राहून मतदान करा, असं आवाहन प्रा. डॉ. सुखदेव थोरात यांच्यासह मान्यवरांनी संघटनांनी केलं आहे.

आवाहनकर्त्यांमध्ये ‘या’ मान्यवरांचा समावेश

प्रा. डॉ. सुखदेव थोरात, प्रा. डॉ. यशवंत मनोहर, जी.जी.परीख डॉ. रावसाहेब कसबे, श्याम मानव, कुमार सप्तर्षि, तुषार गांधी राम पुनियानी,तीस्ता सेतलवाड, उत्तम कांबळे, बी.जी.कोळसे पाटील, सुरेश खोपडे, निरंजन टकले, संभाजी भगत, डॉ. सुरेश खैरनार, ज्ञानेश महाराव, श्यामदादा गायकवाड, सयाजी वाघमारे, माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर, संजय अपरांती, सुनील खोबरागडे दिवाकर शेजवळकर,मेघा पानसरे,आनंद पटवर्धन, जावेद आनंद, स्वरा भास्कर इरफान इंजिनियर, डॉल्फी डिसूझा, एम.ए. खालिद, अन्वर राजन नंदकुमार पाटील, उल्का महाजन, असीम सरोदे , संजय एम.जी, वर्षा देशपांडे, डॉ सलीम खान, नुरुद्दीन नाईक, सईद खान,फिरोज मिठीबोरवाला, शरद कदम , विशाल हिवाळे गुड्डी एस. एल, नागपूर येथील एड. फिरदोस मिर्झा, डाॅ. अन्वर सिद्दीकी, अरविंद गेडाम, प्रदीप नगराळे,जगजीत सिंग, मधुकर मेहकरे, डाॅ. त्रिलोक हजारे, डॉ. बी एस गेडाम, डॉ. संजय शेंडे, किशोर खांडेकर, विजय ओरके,सुनिता जिचकार, जया देशमुख, स्वाती शेंडे, अमन कांबळे, ,डाॅ. बागडे, अरुण गाडे,अशोक सरस्वती बोधी, अमिताभ पावडे, दिलीप खोडके, ज्ञानेश्वर रक्षक, विलास भोंगाडे, डॉ, विमल थोरात, सुगंधा खांडेकर,डाॅ. निकेतन जांभूळकर, डॉ. सुषमा भड, डॉ. सुनील तलवारे, शरद वानखेडे, राज रक्षित, पद्माकर लामघरे, राहुल परुळकर

मविआसोबत मराठा महासंघासह ८० संंघटना

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन ऑफ इंजिनियर्स (बानाई), मराठा सेवा संघ, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, दक्षिणायन, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, एएसएसई, डॉ. आंबेडकर ॲग्रीकोज असोसिएशन ऑफ इंडिया, हिंद- जमात-ए- इस्लाम, ओबीसी महासंघ, जागरूक नागरिक मंच, समता सैनिक दल, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, सम्यक बुद्ध विहार टाकळी सिंग, स्टुडन्टस इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, फोरम ऑफ डेमॉक्रॅसी अँड कम्युनल एमएटी, एसबीआय बॅकवर्ड क्लास वेल्फेअर, आम्रपाली महिला मंडळ, शाक्य मुनी मेमोरियल ट्रस्ट, विश्वभूषण मानव कल्याण संस्था, पीपल्स सोशल इन्स्टिट्यूट, संविधान संस्कृती मिशन, ज्योतिबा फुले अभ्यासिका, ब्ल्यू व्हिजन फोरम, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, गीताई फाउंडेशन, नशाबंदी फाउंडेशन महाराष्ट्र, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, ओबीसी अस्मिता मंच, गुरुदेव सेवा मंडळ, स्टुडन्ट केअर असोसिएशन, ऑल इंडिया बॅकवर्ड क्लास पोस्टल युनियन, तथागत बहुउद्देशीय संस्था, अखिल कुणबी समाज नागपूर, बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ, विदर्भ जाधव कुणबी समाज, फुले आंबेडकर ज्येष्ठ नागरिक मंडळ, रिपब्लिकन विचार मंच, मागासवर्गीय कृषी कर्मचारी अधिकारी महासंघ, विश्वभूषण मानव कल्याण संस्था, रामटेके परिवार प्रतिष्ठान, पश्चिम नागपूर भोजनदान समिती, स्मृतीशेष दशरथ पाटील विकास संस्था, लोखंडे नगर बुद्ध विहार, सिद्धार्थ बुद्ध विहार, असोसिएशन फोर सोशल अँड इकॉनोमिक इक्वॅलिटी, पीपल्स सोशल इन्स्टिट्यूशन, राष्ट्रीय ज्योतिबा फुले अभ्यासिका, आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर, बुद्धिस्ट एम्पॉवरमेंट संघ, बी ए जी ए पी, गर्ल्स ईसलामिक ऑर्गनायझेशन, एम पी जे महिला सद्भावना मंच, जी आय ओ, ओबीसी जनमोर्चा, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, ओबीसी अस्मिता मंच, राष्ट्रीय परिवर्तन परिषद, विदर्भ मोलकरीण संघटना, बी ए एच ओ एस नागपूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुर्वेदिक डॉक्टर्स ऑर्गनायझेशन, डॉ बाबासाहेब आंबेडकर होमिओपॅथी डॉक्टर्स ऑर्गनायझेशन, डॉ बाबासाहेब आंबेडकर डेंटल डॉक्टर्स ऑर्गनायझेशन, सत्यशोधक महिला महासंघ महाराष्ट्र प्रदेश, मैत्रेय संघ, कल्याणी मल्टीपर्पज सोसायटी, बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, खैरे कुणबी समाज संघटना विदर्भ, खेडुले कुणबी समाज, बावणे कुणबी समाज, संबुद्ध महिला संघटना, संजीवनी सखी मंच, दीक्षाभूमी महिला समिती, मुव्हमेंट 21, रिपब्लिकन महिला ट्रस्ट, सम्यक बौद्ध महिला मंडळ सुमन विहार नागपूर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, असोसिएशन ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट नागपूर, ह्यूमन मेता फाउंडेशन या संघटनांनीही महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे.

Whats_app_banner