मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Mamata Banerjee : ममता बॅनर्जी पुन्हा जखमी, हेलिकॉप्टरमध्ये बसताना पडल्या, VIDEO आला समोर

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी पुन्हा जखमी, हेलिकॉप्टरमध्ये बसताना पडल्या, VIDEO आला समोर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 27, 2024 04:38 PM IST

Mamta Banerjee Injured :पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्यादा जखमी झाल्या आहेत. ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारासाठी दुर्गापूर हून आसनसोलकडे हेलिकॉप्टरमधून जात असताना त्या सीटवर पडल्या.

ममता बॅनर्जी पुन्हा जखमी, हेलिकॉप्टरमध्ये बसताना पडल्या
ममता बॅनर्जी पुन्हा जखमी, हेलिकॉप्टरमध्ये बसताना पडल्या

एका महिन्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्यादा जखमी झाल्या आहेत. ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टरमधून जात होत्यात्यावेळी सीटवर पडल्या.या घटनेत ममता बॅनर्जी या किरकोळ जखमी झाल्या आहेत. दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढताना त्यांचा पाय निसटला व त्या सीटवर पडल्या.

ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरने दुर्गापूरहून आसनसोलला निघाल्या होत्या. हेलिकॉप्टरमध्ये बसत असतानाच त्या पाय घसरून पडल्यानंतर सुरक्षेसाठी तैनात कर्मचाऱ्यांनी त्यांना उचलून सीटवर बसवलं. त्यात त्यांना किरकोळ जखम झाली आहे. त्यानंतर त्या त्यात हेलिकॉप्टरने त्या आसनसोलला रवाना झाल्या.

हेलिकॉप्टरमध्ये पडल्यानंतर ममता बॅनर्जी यांना त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांनी सावरले. ममता बॅनर्जी यांची आसनसोलमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या समर्थनार्थ रॅली घेणार आहेत. या रॅलीसाठी जात असताना ममता बॅनर्जी जेव्हा हेलिकॉप्टरमध्ये जात होत्या तेव्हा त्यांचा तोल गेला आणि खाली पडल्या. त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.

तृणमूलच्या प्रमुख व बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काही दिवसापूर्वीही जखमी झाल्या होत्या. घरात ट्रेडमिलवर चालत असताना त्या दुखापतग्रस्त झाल्या होत्या. या घटनेत बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. या घटनेनंतर त्यांना तातडीने एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर तीन टाके घालण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान –

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अमरावती,नांदेड,परभणी,बुलढाणा,यवतमाळ वाशिम,अकोला,वर्धा आणि हिंगोली या आठ लोकसभा मतदारसंघांसाठी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. बुलडाणा (२१),अकोला (३७),वर्धा (२४),यवतमाळ वाशीम (१७),हिंगोली (३३),नांदेड (२३) आणि परभणी (३४) या आठ जागांसाठी एकूण २०४ उमेदवार रिंगणात आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार,वर्ध्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वाधिक ५६.६६ टक्के मतदान झाले आहे.परभणीत ५३.७९ टक्के मतदान झाले असून,मतदारसंघातील एका गावातील नागरिकांनी अतिक्रमणाच्या मुद्यावरून मतदानावर बहिष्कार टाकला होता. नांदेडमध्ये ५२.४७ टक्के,अकोल्यात ५२.४९ टक्के,यवतमाळ वाशिममध्ये ५४.०४ टक्के,अमरावतीत ५४.५०.७६ टक्के,हिंगोलीत ५२.०३ टक्के आणि बुलडाण्यात ५१.२४ टक्के मतदान झाले आहे.

WhatsApp channel