आयपीएल २०२४ च्या ४१ व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) भिडणार आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने चालू मोसमात ७ पैकी ५ सामन्यांत विजयाची चव चाखली आहे. हैदराबाद संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीला ८ सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे, आरसीबी संघाला ७ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हैदराबाद संघाने गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ६७ धावांनी पराभव केला होता. तर दुसरीकडे, आरसीबीला केकेआरकडून एका धावेने पराभव स्विकारावा लागला होता.
सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात गुरुवारी (२५ एप्रिल २०२४) आयपीएलमधील ४१वा सामना खेळला जाईल. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल.
हैदराबाद आणि आरसीबी यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद सिराज, सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत , हिमांशू शर्मा, स्वप्नील सिंग, ग्लेन मॅक्सवेल, रीस टोपले, टॉम करन, विजयकुमार विशक, मयंक डागर, अल्झारी जोसेफ, मनोज भंडागे, आकाश दीप, सौरव चौहान, राजन कुमार.
सनरायझर्स हैदराबाद संघ: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, आकाश महाराज सिंग, ग्लेन फिलिप्स, मयंक अग्रवाल, जयदेव उनाडकट, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत वायस्कांत, फजलहक फारुकी, मार्को जॅनसेन.
संबंधित बातम्या