मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH Vs RCB : ट्रेव्हिस हेड-क्लासेन फ्लॉप, हैदराबाचा घरच्या मैदानावर पराभव, आरसीबीची पराभवाची मालिका संपली

SRH Vs RCB : ट्रेव्हिस हेड-क्लासेन फ्लॉप, हैदराबाचा घरच्या मैदानावर पराभव, आरसीबीची पराभवाची मालिका संपली

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 25, 2024 06:58 PM IST

SRH Vs RCB IPL Live Score : आयपीएल २०२४ मध्ये आज हैदराबाद आणि बंगळुरू आमनेसामने होते. या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा ३५ धावांनी मोठा पराभव केला.

SRH vs RCB ipl 2024 Highlights
SRH vs RCB ipl 2024 Highlights (PTI)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ४१ वा सामना आज (२५ एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत ७ गडी गमावून २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादला २० षटकांत ८ गडी गमावून १७१ धावा करता आल्या.

बेंगळुरूकडून विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतके झळकावली. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने ५० धावांच्या आत ३ मोठे विकेट गमावले. ट्रॅव्हिस हेडला यावेळी कोणतेही वादळ निर्माण करता आले नाही, तो केवळ १ धाव करून बाद झाला. तर त्याचा जोडीदार अभिषेक शर्माने चांगली सुरुवात केली, पण संघाला चांगल्या स्थितीत नेता आले नाही. अभिषेकने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार लगावत ३१ धावा केल्या.

हैदराबादचे फलंदाज विशेषत: फिरकी गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करताना दिसले. आरसीबीच्या फिरकी गोलंदाजांनी या डावात ५ बळी घेतले.

हैदराबाद वि. आरसीबी क्रिकेट स्कोअर

पॅट कमिन्स बाद

कर्णधार पॅट कमिन्सच्या रूपाने हैदराबादला सातवा धक्का बसला. त्याला कॅमेरून ग्रीनने मोहम्मद सिराजच्या हाती झेलबाद केले. त्याने १५ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३१ धावा काढल्या. भुवनेश्वर कुमार नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. 

हैदराबादला दुसरा धक्का

यश दयालने हैदराबादला दुसरा धक्का दिला. त्याने अभिषेक शर्माला ३७ धावांवर बाद केले. या सामन्यात अभिषेक १३ चेंडूत ३१ धावा करून परतला. त्याने २३८.४६ च्या स्ट्राईक रेटने ३ चौकार आणि २ षटकार मारले. नितीशकुमार रेड्डी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. 

ट्रॅव्हिस हेड बाद

हैदराबादला पहिला धक्का ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने बसला. पहिल्याच षटकात त्याला विल जॅकने बाद केले. हेडला एकच धाव करता आली. एडन मार्कराम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. 

आरसीबीच्या २०६ धावा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ७ गडी गमावून २०६ धावा केल्या. या सामन्यात विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतकी खेळी केली. रजत पाटीदारने अवघ्या २० चेंडूत ५० धावा केल्या. तर किंग कोहलीने ४३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. शेवटी कॅमेरून ग्रीन २० चेंडूत ३७ धावा करून नाबाद परतला. तर हैदराबादकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक ३ बळी घेतले.

आरसीबीला पहिला धक्का

टी नटराजनने आरसीबीला पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार फाफ डुप्लेसिसला बाद केले. या सामन्यात आरसीबीला चांगली सुरुवात करण्यात तो यशस्वी ठरला. डुप्लेसिसने २५ धावा केल्या. विल जॅक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

३ षटकांत ४३ धावा

विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. दोघांमध्ये ३ षटकांत ४३ धावांची भागीदारी झाली आहे.

पॅट कमिन्सने तिसरे षटक टाकले. या षटकात एकूण १९ धावा आल्या. कोहलीने २ चौकार आणि प्लेसिसने १ षटकार लगावला. कोहली १९ आणि प्लेसिस २५ धावांवर खेळत आहेत.

आरसीबीची फलंदाजी सुरू

नाणेफेक जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस फलंदाजीसाठी उतरले आहेत. दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. अभिषेक शर्मा डावातील पहिले षटक टाकत आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल.

आरसीबीने टॉस जिंकला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल केलेला नाही. तर हैदराबादच्या प्लेइंग ११ मध्ये एक बदल करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी जयदेव उनाडकटचा समावेश करण्यात आला आहे.

हैदराबाद वि. आरसीबी हेड टू हेड आकडेवारी

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी २४ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने १३ सामने जिंकले आहेत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने १० सामने जिंकले आहेत. हैदराबादने आयपीएलमध्ये आरसीबीविरुद्ध सर्वाधिक २८७ धावा केल्या आहेत.

हैदराबाद वि. आरसीबी पीच रिपोर्ट

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना अनुकुल आहे. अशा स्थितीत पुन्हा चाहत्यांना हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळणार आहे. हैदराबादने यंदाच्या आयपीएलमध्ये २७७ धावांची मोठी धावसंख्या याच मैदानावर साकारली होती. इथलं मैदान फार मोठं नसल्यामुळे चौकार-षटकारही भरपूर पाहायला मिळतात.

जर आपण नाणेफेकीबद्दल बोललो तर जो कर्णधार येथे टॉस जिंकतो तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण या मैदानावर ४० सामने नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत आणि केवळ ३२ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.

IPL_Entry_Point