मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sula Vineyards IPO : नाशिकमधील वाईन उत्पादक कंपनी शेअर बाजारात उतरतेय! लवकरच आयपीओ

Sula Vineyards IPO : नाशिकमधील वाईन उत्पादक कंपनी शेअर बाजारात उतरतेय! लवकरच आयपीओ

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 08, 2022 11:02 AM IST

Sula Vineyards IPO: देशातील आघाडीची वाईन उत्पादक आणि सेलर सुला वाइनयार्ड्सला आयपीओ जारी करण्यासाठी सेबीची मंजुरी मिळाली आहे. कंपनीने या वर्षी जुलैमध्ये सार्वजनिक इश्यूसाठी मसुदा प्रॉस्पेक्टस दाखल केला होता.

Sula wineyard IPO
Sula wineyard IPO

Sula Vineyards IPO : नाशिकमधील मद्यनिर्मिती कंपनी सुला विनयार्ड्सचा आयपीओ येणार आहे. सुला वाईनयार्ड आयपीओ (Sula Vineyards IPO) ला बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून मंजुरी मिळाली आहे. देशातील आघाडीची वाइन उत्पादक आणि सेलर सुला विनयार्ड्सला आयपीओ जारी करण्यासाठी सेबीची मंजुरी मिळाली आहे. कंपनीने या वर्षी जुलैमध्ये सार्वजनिक इश्यूसाठी मसुदा प्रॉस्पेक्टस दाखल केला होता.

असा असेल IPO

हा आयपीओ थेट विक्री ऑफर (OFS) असेल. यामध्ये प्रवर्तक, गुंतवणूकदार आणि इतर भागधारक २५,५४६,१८६ इक्विटी शेअर्स ऑफर करतील. सुला व्हाइनयार्ड्स लाल, पांढरी आणि स्पार्कलिंग वाईन विकते. ते 1१३ ब्रँडच्या अंतर्गत ५६ प्रकारचे मद्य तयार करते.

गेल्या वर्षी सुला वाईनयार्ड (Sula Vineyards) ने दिलेल्या अहवालानुसार, कंपनीची उत्पादन क्षमता १४.५ दशलक्ष लिटर आहे. कंपनीचा नफा आर्थिक वर्ष २२ मध्ये अनेक पटींनी वाढून ५२.१४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष 21 मध्ये केवळ 3.01 कोटी रुपये होता. या कालावधीत महसूल ८.६०% वाढला आणि तो ४५३२.९२ कोटी रुपये होता.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग