मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata Gorup Stocks : टाटा समुहातील हा शेअर्स ५२ आठवड्याच्या उच्चांकावर, ३० टक्के उसळी, खरेदी करा

Tata Gorup Stocks : टाटा समुहातील हा शेअर्स ५२ आठवड्याच्या उच्चांकावर, ३० टक्के उसळी, खरेदी करा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 15, 2023 12:12 PM IST

Tata Gorup Stocks : टाटा मोटर्स कंपनीने मजबूत तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यानंतर स्टाॅक्समध्ये तेजी दिसत आहे. विविध ब्रोकरेज फर्म्सनी या स्टाॅक्समध्ये तेजी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

tata motors HT
tata motors HT

Tata Gorup Stocks : टाटा समूहातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सोमवारी चार टक्क्यांपर्यंत उसळी पाहायला मिळाली. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीतील मजबूत निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात टाटा मोटर्सचे शेअर्स वधारले. कंपनीच्या शेअर्सनी ५३७.१५ रुपयांची ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली आहे.

शानदार तिमाही निकाल

टाटा मोटर्सने या वर्षी मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत ५,४०७.८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीला १,०३२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीचा महसूल वार्षिक ३५ टक्क्यांच्या वाढीसह १,०५,९३२ कोटी रुपये होता. कंपनीच्या भक्कम तिमाही निकालांमुळे टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये उसळी निर्माण झाली.

स्टॉकबद्दल ब्रोकरेजचे मत

अनेक आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसेस या स्टॉकवर खूप तेजीत आहेत. अनेक ब्रोकरेज हाऊसेसनी स्टॉकवर बाय रेटिंग आहेत.

जेफरीजने ६६५ रुपयांचे लक्ष्य ठेवून हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तो सध्याच्या पातळीपासून २९ टक्के उसळीची शक्यता दाखवतो. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने हा स्टॉक ५३० रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे सध्याच्या पातळीपेक्षा ३% ची वाढ दर्शवते. एमकेने स्टॉकची किंमत ५६५ रुपये ठेवली आहे. ब्रोकरेजने या स्टॉकवर बाय रेटिंग निश्चित केले आहे. याचा अर्थ येत्या काळात या शेअरमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

WhatsApp channel

विभाग