मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata Job : मेटा, ट्विटरमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना टाटांचा आधार, या कंपनीत देणार ८०० नोकऱ्या

Tata Job : मेटा, ट्विटरमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना टाटांचा आधार, या कंपनीत देणार ८०० नोकऱ्या

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 19, 2022 06:57 PM IST

Tata News: टाटा मोटर्सच्या या कंपनीने जगभरातील विविध देशांतील सुमारे ८०० लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली आहे. त्याचे तपशील येथे जाणून घेता येतील.

tata motors HT
tata motors HT

Jaguar Land Rover Job : जागतिक मंदीचे सावट जगभरात पसरत आहे. नुकतेच ट्विटर, फेसबुकची मूळ कंपनी मेटा यांसारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांसमोर रोजगाराचे संकट निर्माण होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत भारतातील दिग्गज टाटा कंपनीने अशा मोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. टाटा मोटर्सने आपल्या ब्रिटीश उपकंपनी जग्वार लँड रोव्हरमध्ये मेटा आणि ट्विटरमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीची ऑफर दिली आहे.

ब्लूमबर्गमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जग्वार लँड रोव्हर जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्ण संधी घेऊन येत आहे. आता ट्विटर, मेटा आदी मोठ्या कंपन्यांमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना विविध विभागांमध्ये नोकरी दिली जाणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी सेवेसोबतच डिजिटल सेवेत काम करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.

जॅग्वार लँड रोव्हरच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना कंपनीत रोजगार मिळणार आहे. सध्या सुमारे ८०० नवीन कर्मचाऱ्यांना रोजगार निर्माण करेल. यामध्ये डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग, इलेक्ट्रिफिकेशन, क्लाउड सॉफ्टवेअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंग इत्यादीसारख्या अनेक क्षेत्रातील लोकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, भारत, चीन, हंगेरी, आयर्लंड यांसारख्या अनेक देशांमध्ये ८०० लोकांना नोकऱ्या देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग