मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Realme C65 5G: रियलमी सी६५ 5G भारतात लॉन्च; अवघ्या १२ हजारांत मिळवा उत्कृष्ट कॅमेरा आणि दमदार बॅटरी

Realme C65 5G: रियलमी सी६५ 5G भारतात लॉन्च; अवघ्या १२ हजारांत मिळवा उत्कृष्ट कॅमेरा आणि दमदार बॅटरी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 26, 2024 09:25 PM IST

Realme C65 5G launched in India: रियलमी सी६५ 5G १२० हर्ट्झ डिस्प्ले आणि ५००० एमएएच बॅटरीसारख्या वैशिष्ट्यांसह भारतात लॉन्च झाला आहे.

रिअलमी सी ६५ 5G भारतात लॉन्च झाला आहे.
रिअलमी सी ६५ 5G भारतात लॉन्च झाला आहे. (Realme)

Realme C65 price in india: स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमीचा नवा स्मार्टफोन रिअलमी सी६५ 5G भारतात लॉन्च झाला आहे. कंपनीने रिअलमी नार्झो ७० आणि नार्झो ७० एक्स लॉन्च केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा स्मार्टफोन बाजारात उतरवला. रियलमी सी ६५ 5G च्या स्टँडआऊट फीचर्समध्ये १२० हर्ट्झ डिस्प्ले, ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरीचा समावेश आहे. फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या नवीन रियलमी सी६५ 5G बद्दल सर्व काही.

ट्रेंडिंग न्यूज

रियलमी सी ६५ 5G मध्ये ६.७ इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आणि पीक ब्राइटनेस ६२५ निट्स आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर देण्यात आला आहे, ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येऊ शकते. स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सिस्टीम असून प्रायमरी ५० मेगापिक्सल शूटर आणि सेकंडरी दोन मेगापिक्सल एमपी सेन्सर आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रियलमी सी६५ 5G अँड्रॉइड १४ आऊट-ऑफ-द-बॉक्सवर चालतो आणि कंपनीने २ वर्षांचे ओएस अपडेट आणि ३ वर्षांचे सिक्युरिटी पॅच देण्याचे आश्वासन दिले आहे. यात ५००० एमएएचची बॅटरी आहे, जी यूएसबी टाइप-सी द्वारे १५ वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन पॉवर वीटसह चालतो. टिकाऊपणाच्या बाबतीत, रियलमी सी ६५ 5G ला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी आयपी ५४ रेटिंग देण्यात आले आहे.

Realme Upcoming Phones: तगड्या फीचर्ससह रिअलमीचे 'हे' दोन फोन लवकरच बाजारात; काय-काय मिळणार?

किंमत आणि उपलब्धता

रियलमी सी ६५ तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यात ४ जीबी रॅम/ ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत १० हजार ४९९ रुपये आहे. तर, ४ जीबी/१२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ११ हजार ४९९ रुपये आहे. टॉप-एंड ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत १२ हजार ४९९ रुपये आहे.

आजपासून खरेदीसाठी उपलब्ध 

आज, २६ एप्रिलपासून फ्लिपकार्ट, ब्रँड वेबसाइट तसेच ऑफलाइन स्टोअर्सवर हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. एचडीएफसी, अ‍ॅक्सिस आणि एसबीआय बँक कार्ड ट्रान्झॅक्शनवर ग्राहकांना १ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

WhatsApp channel

विभाग