मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO listing : लाईफ सायन्सेस क्षेत्रातील या कंपनीचा आयपीओ येणार, अर्ज सेबीकडे सादर

IPO listing : लाईफ सायन्सेस क्षेत्रातील या कंपनीचा आयपीओ येणार, अर्ज सेबीकडे सादर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 18, 2022 01:37 PM IST

जागतिक लाईफ सायन्सेस क्षेत्रातील या कंपनीने आयपीओसाठी आपला ड्राफ्ट रेड हिअगिंर प्राॅस्पेक्ट्स सेबीकडे नुकताच सादर केला. आयपीओतून ३२०० कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.

IPO HT
IPO HT

IPO listing : जागतिक लाईफ सायन्सेस क्षेत्रातील इंडिजेन कंपनीने आयपीओसाठी आपला ड्राफ्ट रेड हिअगिंर प्राॅस्पेक्ट्स सेबीकडे नुकताच सादर केला. आयपीओतून ३२०० कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.

जागतिक लाईफ सायन्सेस क्षेत्रातील या कंपनीने आयपीओसाठी आपला ड्राफ्ट रेड हिअगिंर प्राॅस्पेक्ट्स सेबीकडे नुकताच सादर केला. कंपनीच्या प्रारंभीच्या पब्लिक ऑफरिंगमध्ये ९५०० दशलक्ष रूपयांपर्यंत नवीन इश्यू आणि समभागधारकांना सुमारे ३६.३ दशलक्ष समभागांच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश आहे.

विक्रीच्या ऑफरमध्ये वैयक्तिक विकणाऱ्या समभागधारकांकडून (मनिष गुप्ता, डॉ. भास्करन नायर आणि अनिता नायर) सुमारे २.७ दशलक्ष समभागांचा आणि कार्लाइल, ब्रायटन पार्क कॅपिटल आणि नादाथूर फॅमिली ऑफिससारख्या विद्यमान गुंतवणूकदारांकडून ३३.६ दशलक्ष समभागांचा समावेश आहे. इंडिजेनने फेब्रुवारी २०२१ मध्ये कार्लाइल ग्रुप आणि ब्राइटन पार्ककडून २०० दशलक्ष डॉलर्सची उभारणी केली आहे.

आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या निधींचा वापर कर्जाची परतफेड/ पूर्वप्रदान, भांडवली खर्च, त्यांच्या एका मागील ताब्यासाठी प्रलंबित असलेल्या रकमेचे प्रदान, वाढीसाठी वित्तपुरवठा आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट हेतूंसाठी केला जाईल.

लाइफ सायन्सेस कंपन्या विशेषीकृत बुद्धिमत्तेची आणि इनहाऊस डिजिटल क्षमतांची कमतरता, वाढते विक्री आणि मार्केटिंग (एसअँडएम) आणि संशोधन आणि विकास (आरअँडडी) खर्च, नियामक वैद्यकीय कामकाज प्रक्रियांचे सुलभीकरण आणि शल्यचिकित्सकीय चाचण्यांमधील वाढती गुंतागूंत या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर वाणिज्यिकीकरण कार्य आऊटसोर्स करत आहेत. हा उद्योग डिजिटल वापरात इतर उद्योगांपेक्षा तुलनेने मागे आहे. त्यामुळे इंडिजेनसारख्या डिजिटल फर्स्ट कंपन्यांना वाढीसाठी महत्त्वाची संधी मिळते आहे.

इंडिजेनचा विविध कंपन्या ताब्यात घेऊन मूल्यनिर्मिती करण्याचा विक्रम आहे. कंपनीने आपल्या स्थापनेपासून ११ कंपन्या ताब्यात घेऊन आपल्या समूहात समाविष्ट केल्या आहेत.

इंडिजेनने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १६६५ कोटी रूपयांचा महसूल कार्यान्वयनातून नोंदवला असून आर्थिक वर्ष २०१९-२० ते आर्थिक वर्ष २०२१-२२ पर्यंत ६१ टक्के सीएजीआरने तो वाढला आहे. ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत या कंपनीने कार्यान्वयनातून ५२१ कोटी रूपयांचा महसूल नोंदवला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १६३ कोटी रूपयांचा करोत्तर नफा नोंदवला. आर्थिक वर्ष २०१९-२० ते आर्थिक वर्ष २०२१-२२ पर्यंत ८१ टक्के सीएजीआरने तो वाढला आहे. तिने ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत ८६ कोटी रूपयांचा करोत्तर नफाही नोंदवला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग