मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PF Account Balance Check: पीएफ बॅलन्स चेक करायचाय ? या चार स्टेप्स ठरतील फायद्याच्या

PF Account Balance Check: पीएफ बॅलन्स चेक करायचाय ? या चार स्टेप्स ठरतील फायद्याच्या

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 10, 2023 02:22 PM IST

PF Account Balance Check: पीएफ खातेधारकाला आता त्याचा बॅलेन्स तपासण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तो घरी बसून अनेक प्रकारे त्याचा पीएफचा बॅलन्स सहज तपासू शकतो. या चार स्टेप्सद्वारे तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स तपासू शकता. बातमी संपूर्ण वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा -

check ypur PF balance here_HT
check ypur PF balance here_HT

PF Account Balance Check: तुम्ही नोकरी करत असाल तर दर महिन्याला तुमच्या पगारातून भविष्य निर्वाह निधी (PF) साठी काही भाग कापला जातो. त्याचा थेट फायदा निवृत्तीनंतर होतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या सदस्यांच्या सोयीसाठी सातत्याने पावले उचलत असते. ईपीएफओच्या बहुतांश सेवा आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या पीएफ खात्याशी संबंधित कामासाठी कुठेही जाण्याची गरज नाही.

ट्रेंडिंग न्यूज

मिस़्ड काॅल द्या

तुमच्या पीएफ खात्यात पैसे जमा होत आहेत की नाही हे तुम्ही. मिस्ड कॉलद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता. यासाठी दोन अटी आहेत, एक मोबाइल क्रमांक ईपीएफओ ​​पोर्टलवर य़ूएएनसह सक्रिय केलेला असावा आणि दुसरा यूएएनचे केवायसी बँक खाते क्रमांक, आधार किंवा पॅन क्रमांकासह असावे. यानंतर, यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्य मिस्ड कॉल देऊन त्याचा बॅलन्स शोधू शकतो.

यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०११-२२९१०१४०६ वर मिस्ड कॉल द्या. दोन रिंगनंतर हा कॉल आपोआप डिस्कनेक्ट होईल. यासाठी कोणतेही पैसे घेतले जाणार नाहीत. मिस्ड कॉल दिल्यानंतर काही वेळातच, ईपीएफओ तुमच्या मोबाइलवर एक एसएमएस पाठवेल ज्यामध्ये तुमच्या पीएफ खात्यातील बॅलन्ससंदर्भातील माहिती असेल.

अशाप्रकारे तपासा पीएफ बॅलन्स

पीएफ खात्यात व्याज जमा झाल्यानंतर तुम्ही तुमची रक्कम तपासू शकता. पीएफ खात्यातील शिल्लक अनेक प्रकारे तपासली जाऊ शकते. यामध्ये तुम्ही पीएफ खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे तपासू शकता. अशाच पद्धतींची माहिती घेऊया -

एसएमएसद्वारे तपासा

- तुमच्या मोबाईल नंबरवरून EPFOHO UAN ENG ७७३८२९९८९९ वर एसएमएस पाठवा.

- एसएमएसमध्ये लिहिलेले शेवटची ३ अक्षर तुमची पसंतीची भाषा दर्शवतात. यामध्ये इएनजी म्हणजे इंग्रजी. इंग्रजी, हिंदी, तमिळ, मराठी, बंगाली, कन्नड, पंजाबी, तेलुगु, मल्याळम आणि गुजराती अशा एकूण १० भाषांमधून तुम्ही निवडू शकता.

- यामध्ये हिंदीसाठी एचआयएन, पंजाबीसाठी पीयूएन, गुजरातीसाठी जीयूजे, मराठीसाठी एमएआर, पाठवावे लागणार आहेत.

- युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) वर नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवरून एसएमएस पाठवावा लागेल.

- पीएफओ तुमचे शेवटचे पीएफ योगदान, शिल्लक तपशील आणि उपलब्ध केवायसी तपशील तुमच्या मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे पाठवेल.

उमंग अॅपद्वारेही तपासता येतो पीएफ बॅलन्स

उमंग हे मोबाईल अॅप विविध सेवा पुरवते. तुम्ही तुमचा UAN आणि OTP वापरून लॉग इन करून UMANG अॅपवर तुमची EPF शिल्लक तपासू शकता आणि तुमचे PF पासबुक मिळवू शकता. त्यासाठी प्लेस्टोअरमध्ये जाऊन उमंग अॅप डाऊनलोड करा. अॅपमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लाॅगइन केल्यानंतर त्यातील ईपीएफओ पर्याय निवडा. ईपीएफओचा बॅलन्स तपासण्यासाठी 'पासबूक पहा' वर क्लिक करा. तुमचा यूएएन क्रमांक टाकावा आणि ओटीपीवर क्लिक करा. पुढील प्रक्रिया केल्यावर तुम्हाला पीएफ बॅलन्स तपासता येईल.

ईपीएफओचे संकेतस्थळ

ईपीएफओच्या संकेतस्थळावरही तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स तपासता येतो. यातील एम्प्लाॅईज या सेक्शनवर जाऊन यूएएन क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर यूजर्सला त्याला बॅलन्स चेक करता येईल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग