मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : उच्चांकी पातळीपेक्षा स्वस्त झाले सोने चांदी, दर घसरणीचं नेमके कारण व आजच्या किंमती काय आहेत ?

Gold Silver Price Today : उच्चांकी पातळीपेक्षा स्वस्त झाले सोने चांदी, दर घसरणीचं नेमके कारण व आजच्या किंमती काय आहेत ?

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 28, 2023 08:53 AM IST

Gold Silver price today 28 May 2023 : इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान वस्तूंच्या किंमतींमध्ये उच्चांकी पातळीपेक्षा घसरण झाली आहे. पाहा आजच्या किंमती -

Gold Silver price today HT
Gold Silver price today HT

Gold Silver price today 28 May 2023 : इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, शुक्रवारी सोन्याचा दर ६००५२ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर उघडला होता. त्याच वेळी, मागील व्यवहाराच्या दिवशी तो ६०३६१ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. त्यामुळे किंमतीत ३०९ रुपये प्रति दहा ग्रॅमची घट झाली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

सोने सध्या त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा अंदाजे १५३३ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ११ मे २०२३ रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव ६१५८५ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

शुक्रवारी चांदीचा बंद भाव ७०१९१ रुपये प्रति किलो इतका होता. मागील व्यवहाराच्या दिवशी चांदी ७०२८५ प्रति किलो दराने बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात ९४ रुपयांची घट झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने तेजीत आहे. ५ जून २०२३ चा सोन्याचा फ्युचर्स ट्रेड ११९ रुपयांच्या वाढीसह ५९,५७९ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, ५ जून २०२३ रोजी चांदीचा फ्युचर्स ट्रेड ५५८.०० रुपयांच्या वाढीसह ७०,८००.०० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

हे आहे दर घसरणीचे कारण

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची झपाट्याने खरेदी-विक्री होत आहे. अमेरिकेमध्ये, सोने प्रति औंस १,९५०.७९ या दराने १०.३१ डाॅलर्सच्या वाढीसह व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदी ०.३२ डाॅलर्सच्या वाढीसह २३.०३ डाॅलर्स औंस पातळीवर व्यवहार करत आहेत.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग