मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : तुमच्या घरी लग्नसराईची धामधूम आहे ? तर आजच खरेदी करा सोने चांदी, किंमती आहेत स्थिर

Gold Silver Price Today : तुमच्या घरी लग्नसराईची धामधूम आहे ? तर आजच खरेदी करा सोने चांदी, किंमती आहेत स्थिर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 11, 2023 09:37 AM IST

Gold Silver price today 11 May 2023 : लग्नसराईची धामधूम असलेल्या घरांमध्ये सोने चांदी खरेदी करण्याची आजची सुवर्ण संधी आहे. कारण दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती उच्चांकी पातळीपेक्षा स्वस्तात विकल्या जात आहेत.

Gold Silver price HT
Gold Silver price HT

Gold Silver price today 11 May 2023 : तुमच्या कुटुंबात भाऊ, बहीण, काका यांचे लग्न असेल, तर सोने खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. कारण ही संधी हुकली तर पश्चाताप होईल. आजकाल सोन्याचे दर उच्चांकी पातळीपेक्षा स्वस्त दराने विकले जात आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अजिबात उशीर करू नका, कारण अशा संधी वारंवार येत नाहीत.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

आज सोन्याच्या किंमती २४ कॅरेटसाठी ६२२८० रुपये आहेत. काल त्या अंदाजे ६२२८० रुपये होत्या. कालच्या तुलनेत त्यात आज कोणताही बदल झालेला नाही. तर २२ कॅरेटसाठी आजचे दर हे अंदाजे ५७१०० रुपये प्रति तोळा आहेत. काल ते अंदाजे ५७१०० रुपये प्रति तोळा होत्या. कालच्या तुलनेत त्यात आज कोणतीही वाढ झालेली नाही.

चांदीच्या किंमती आज ७८००० रुपये प्रति किलोंच्या दरात आहे. त्यात कालच्या तुलनेत कोणताही बदल झालेला नाही.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग