मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Auto Expo 2023 : ती स्वत: लाच बॅलेन्स करते, लेग स्टँड नाही, लिगर मोबिलिटीची ही स्कूटर पहाच !

Auto Expo 2023 : ती स्वत: लाच बॅलेन्स करते, लेग स्टँड नाही, लिगर मोबिलिटीची ही स्कूटर पहाच !

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 16, 2023 03:11 PM IST

Auto Expo 2023 : इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी लिगर मोबिलीटीची सेल्फ बॅलेस फिचर असलेली स्कूटर २०२३ च्या मध्यावर बाजारात दिसणार आहे. या स्कूटरला लेग स्टॅड नाहीच तर ती स्वत : च स्वत ला बॅलन्स करते. पहा व्हिडिओ आणि जाणून घ्या फिचर्स -

LIger mobility E scooter HT
LIger mobility E scooter HT

Auto Expo 2023 : यावर्षी एक अशी स्कूटर दाखल होत आहे की जी स्वत : च स्वत ला बॅलेन्स करु शकेल. तिला इतर स्कूटर्सप्रमाणे लेग स्टॅंड्स नाहीत. नवशिक्यांनाही ती ड्राईव्ह करण्यास सोप्पी होईल. गाडी चातवताना स्पीड कमी झाल्सास या ई स्कूटरवरुन पडण्याची भिती नसेल.. ही सर्व टेक्नाॅलाॅजी प्रत्यक्षात उतरवली आहे ती मुंबईतीलल ई व्हेईकल बनवणाऱ्या लिगर मोबिलीटीने. देशातील पहिली सेल्फ बॅलेन्स स्कूटर त्यांनी आज दिल्लीतील आॅटो एक्सपोमध्ये दाखल केली. सेल्फ बॅलेन्स हा यूएसपी पाॅईंट असलेल्या स्कूटरमध्ये लिगर एक्स आणि लिगर एक्स प्लस हे दोन व्हेरियंट्स असून पुढील दोन दिवसात कंपनी ही ई स्कूटर बाजारात दाखल करणार आहे.

लिगरने ऑटोबॅलेंसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून आपली ई-स्कूटर डिझाइन केली आहे. सेल्फ-बॅलन्सिंगबाबत कंपनीने सांगितले की, या खास वैशिष्ट्यामुळे ई-स्कूटर कमी वेगाने किंवा थांबल्यावर आपोआप संतुलन राखण्यास सक्षम असेल. साधारणपणे दुचाकीचा बॅलन्स कमी वेगापेक्षा जास्त वेगाने सहज करता येतो. पण सेल्फ-बॅलन्स फीचरने सुसज्ज असलेली ई-स्कूटर कमी गतीने किंवा थांबल्यावर संतुलित करता येते. ई-स्कूटर ड्रायव्हरला सेल्फ बॅलन्स फीचर मॅन्युअली सक्रिय करण्याचा पर्याय असेल. ड्रायव्हर त्याच्या वेगानुसार हे फीचर सेट करू शकणार आहे.

फिचर्स

लिगर एक्स आणि लिगर एक्स प्लसमध्ये सेल्फ बॅलेन्स वैशिष्ट्य साऱखी आहेत. नवीन ई-स्कूटरमध्ये अतिशय खास डिझाइनची एलईडी हेडलाइट आहे. ई-स्कूटरच्या दोन्ही प्रकारांचा कमाल वेग ताशी ६५ किलोमीटर आहे. लिगर एक्स ई-स्कूटर एका चार्जमध्ये ६० किलोमीटरची रेंज देते. या स्कूटरमध्ये लावलेल्या डिटेचेबल बॅटरीचा चार्जिंग वेळ ४.५ तास आहे. दुसरीकडे, लिगर एक्स प्लसमध्ये नॉन-डिटेचेबल बॅटरी आहे. लीगर एक्स प्लस ई-स्कूटर एका चार्जमध्ये १०० किलोमीटर अंतर कापेल. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ३ तास लागतील. माहितीनुसार, कंपनीकडून दोन्ही प्रकारांसाठी फास्ट चार्जिंगचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाईल आणि यासाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते.

दोन्ही प्रकारांमध्ये स्मार्टफोनशी कनेक्ट होण्यासाठी ४ जी कनेक्टिव्हिटी आणि जीपीएस प्रणाली अंतर्भूत करण्यात आली आहे. याच्या मदतीने ई-स्कूटरचे लाईव्ह लोकेशन, राइड हिस्ट्री, बॅटरी पॅक एसओसी आणि टेंपरेचरची माहिती मिळेल. नवीन मोबाइल अॅप कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असलेल्या या ई-स्कूटरमध्ये अपघात, सेवा, देखभाल यासंबंधीच्या सर्व सूचनाही उपलब्ध असतील. लिगर एक्स प्लसमध्ये अतिरिक्त टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात नेव्हिगेशन माहिती फोन कॉल आणि मेसेज अलर्टसही उपलब्ध असतील.

किंमत

कंपनीने लिगर एक्स आणि लिगर एक्स प्लस प्रकार ५ रंगांमध्ये उपलब्ध असतील – ग्रे, पोलर व्हाइट, ब्लू, टायटॅनियम आणि रेड. दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग २०२३ च्या मध्यापासून सुरू होईल. माहितीनुसार, कंपनी २०२३ च्या शेवटी आपल्या ई-स्कूटरची डिलिव्हरी सुरू करेल. लिगर एक्सची एक्स-शोरूम किंमत (दिल्ली) सुमारे १.७ लाख रुपये आणि लिगर एक्स प्लसची सुमारे १.९ लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग