Dell layoffs : लॅपटाॅप, डेस्कटाॅपला गिऱ्हाईकच नाही! ‘डेल' कंपनी ६,६०० कर्मचाऱ्यांना काढणार
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dell layoffs : लॅपटाॅप, डेस्कटाॅपला गिऱ्हाईकच नाही! ‘डेल' कंपनी ६,६०० कर्मचाऱ्यांना काढणार

Dell layoffs : लॅपटाॅप, डेस्कटाॅपला गिऱ्हाईकच नाही! ‘डेल' कंपनी ६,६०० कर्मचाऱ्यांना काढणार

Updated Feb 06, 2023 06:36 PM IST

Dell layoffs : जगभरातील टाळेबंदीच्या बातम्यांदरम्यान आता डेल टेक्नॉलॉजीज या दिग्गज कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे.

Dell layoffs HT
Dell layoffs HT

Dell layoffs : आयटी क्षेत्रात सर्वाधिक नोकरकपातीचे गंडांतर सध्या सुरु असून आता त्यात अजून एका दिग्गज आयटी कंपनीची भर पडली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, डेल टेक्नॉलॉजीजच्या कर्मचाऱ्यांवर छाटणीची टांगती तलवार आहे. डेल आपली एकूण जागतिक क्षमता म्हणजेच जागतिक कर्मचार्‍यांपैकी ५ टक्के कमी करणार आहे. याचाच अर्थ कंपनी ६६५० कर्मचार्‍यांना काढून टाकणार आहे.

लॅपटाॅप निर्मात्यांपैकी अग्रेसर असलेली डेल कंपनी यावर्षी कर्मचारी कपात करणारी पहिली कंपनी आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, को-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी सांगितले की, कंपनीचा निर्णय बाजारातील परिस्थितीवर अवलंबून आहे. भविष्यातही कंपनी कर्मचारी कपात करू शकते.

क्लार्कने कर्मचार्‍यांना लिहिलेल्या नोटमध्ये लिहिले आहे की, यापूर्वी कंपनीने २०२० मध्ये कोविड महामारीच्या काळात टाळेबंदीची घोषणा केली होती. नोव्हेंबरमध्ये, एचपीने जाहीर केले होते की वैयक्तिक संगणकांची मागणी कमी होत आहे, ज्यामुळे पुढील तीन वर्षांत ६००० लोकांना कामावरून कमी केले जाईल. या छाटणीनंतर सुमारे ३९००० कर्मचारी डेलमध्ये राहतील. मार्च २०२२ च्या फाइलिंगनुसार, कंपनीचे एक तृतीयांश कर्मचारी यूएसमध्ये राहतात. डेलने इंडियाने या टाळेबंदीबद्दल पुष्टी केली आहे. परंतु नोकरीतील कपातीबद्दलच्या संख्येबद्दल माहिती दिली नाही.

Whats_app_banner