मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Financial planning: पैशांच्या बाबतीत बहुतेक भारतीय करतात 'या' पाच मोठ्या चुका; तुम्हीही यात नाही ना?

Financial planning: पैशांच्या बाबतीत बहुतेक भारतीय करतात 'या' पाच मोठ्या चुका; तुम्हीही यात नाही ना?

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 06, 2023 05:20 PM IST

Financial planning : आयुष्यात आर्थिक शिस्त आणि आपले वित्त व्यवस्थापित करण्याबद्दल योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. हे केवळ तुमचा पैसा वाढवण्यास मदत करतेच, पण त्याचबरोबर राहणीमानाचा दर्जा देखील वाढवते.

financial planning HT
financial planning HT

Financial planning: आयुष्यात आर्थिक शिस्त आणि आपले वित्त व्यवस्थापित करण्याबद्दल योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. हे केवळ तुमचा पैसा वाढवण्यास मदत करतेच, पण त्याचबरोबर राहणीमानाचा दर्जा देखील वाढवते.

ट्रेंडिंग न्यूज

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ,हे एक क्षेत्र आहे ज्यात भारतीय पिछाडीवर आहेत. आर्थिक नियोजन करताना अनेकदा आपण मोठ्या चुका करतो. अनेक प्रकारच्या गुंतवणूक योजनांतील गुंतवणूकीपासून ते अगदी योग्य वेळी सोने खरेदीपर्यतं पैशाच्या बाबतीत आपल्याकडून वारंवार चुका होतात.

खाली सूचीबद्ध काही मोठ्या चुका आहेत, ज्या श्रुतीचे वडील इतर अनेक भारतीय वडिलांप्रमाणे वर्षानुवर्षे करत आहेत. याउलट, श्रुतीने एक जागरूक तरुण म्हणून पारंपरिक पद्धतींमध्ये बदल सुचवले आहेत.

गादीखाली अथवा तांदुळाच्या भांड्यात पैसे साठवणे

श्रुतीचे वडील पैसे वाचवत राहतात. पण त्यांना त्यांच्या बचतीवर परतावा मिळेल याची शाश्वती नाही. गादीखाली, अल्मिरात, स्वयंपाकघरातील डब्यांमध्ये आणि जवळपास सर्वत्र पण जास्त उत्पन्न देणार्‍या खात्यात पैसे टाकणे हा त्यांचा अनेक वर्षांपासूनचा दृष्टिकोन आहे. या पद्धतीत बचत करण्याचा दृष्टीकोन हा केवळ तात्कालीक आहे.

दुसरीकडे, श्रुतीने तिच्या वडिलांना आपली बचत अशा फंडांमध्ये जमा करण्याचे सुचवले आहे जे प्रभावी व्याजदर देतात. इथे सहज विचार येतो की , ‘बचत किंवा चालू खात्यामध्ये पैसे का ठेवू नयेत ? याचे उत्तर एकच आहे की, दोन्ही खात्यांपेक्षा फंडातून मिळाणारे व्याजदर हे अधिक आकर्षित असणार आहे.

आर्थिक नियोजनाचा अभाव

बहुदा भारतीय लोक हे केवळ प्रवाहासोबत चालणे अधिक पसंत करतात. पण आर्थिक नियोजन असणे गरजेचे आहे. कारण ते तुमचे आणि तुमच्या कुटूंबाचे भवितव्य सुनिश्चित करते.

तरुण काळातील गुंतवणूक फायद्याची

बहुसंख्य भारतीय बाँन्ड्स आणि फंडातील गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत नाहीत. किंबहुना आपल्याजवळील रक्कमेतील गुंतवणूक ही तरुण वयापासून केली जात नाही. निवृत्तीच्या आधी काही वर्षे ते बचतीचा मार्ग निवडतात.

विमा खरेदीबाबत अज्ञानी

बहुतेक भारतीय विमा पॉलिसींना पैशाचा अपव्यय आणि फसवणुकीचे माध्यम मानतात जे पूर्णपणे खोटे आहे. लाइफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स इत्यादींमध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे संरक्षण तर होतेच शिवाय तुमच्या पैशाचा सर्वोत्तम वापरही होतो.याव्यतिरिक्त, जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असाल तर तुमचा विमा उतरवला असल्याची खात्री करा. ही तुमच्या कुटुंबासाठी एक संपत्ती आहे आणि दीर्घकाळात त्यांचे संरक्षण करते.

एकाच पद्धतीतील गुंतवणूक

बहुतेक भारतीयांची त्यांची सर्व रक्कम रिअल इस्टेट किंवा सोन्यामध्ये एकाच प्रकारच्या मालमत्तेत गुंतवण्याची परंपरागत मानसिकता असते. यामुळे तुमच्या पैशाची वाढ खुंटते. तसेच, यामुळे संपूर्ण कॉर्पसला धोका निर्माण होतो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की 'कसे?' तर हे अगदी सोपे आहे, जर तुम्ही तुमचा सर्व पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवला असेल आणि एखाद्या सकाळी रिअल इस्टेटच्या किमती कमी झाल्या तर तुमचा संपूर्ण पोर्टफोलिओ त्रास सहन करावा लागेल आणि तुमच्या सर्व पैशाचे मूल्य घसरेल.

कुटूंबावरही होतो परिणाम

तुमची आर्थिक हाताळणी करताना चुका केल्यास तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर खोलवर परिणाम होऊ शकतो. तुम्‍हाला आर्थिक शिस्तीची आणि तुमच्‍या कर रिटर्न्सची चांगली जाण आहे याची खात्री करा. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग