मराठी बातम्या  /  बिझनेस  /  WhatsApp Update : मस्तच! तुमच्या आवाजातही ठेवता येणार व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस; 'असं' वापरा भन्नाट फीचर

WhatsApp Update : मस्तच! तुमच्या आवाजातही ठेवता येणार व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस; 'असं' वापरा भन्नाट फीचर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 06, 2023 05:00 PM IST

WhatsApp status update : आपल्या युजर्सना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच तत्पर असते. तीच तत्परता दाखवत आता आणखी एक फीचर आणण्यात आलं आहे.

WhatsApp status
WhatsApp status

WhatsApp status update : व्हॉट्सअ‍ॅप हा आजच्या घडीला सर्वात वेगवान आणि लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. ही लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आपल्या अवतारात सातत्यानं बदल करत असते. अनेक नवनवे पर्याय युजर्सना देत असते. याच मालिकेतील एक भन्नाट फीचर व्हॉट्सअ‍ॅपनं आणलं आहे. या फीचरमुळं चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना आता आपले स्टेटस त्यांच्या स्वत:च्या आवाजात ठेवता येणार आहे. सुमारे ३० सेकंदांपर्यंतचे व्हॉइस रेकॉर्डिंग युजर शेअर करू शकणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

WhatsApp च्या ताज्या बीटा व्हर्जनमध्ये हे नवे फीचर आहे. यात फोटो, व्हिडिओ आणि मजकुराच्या व्यतिरिक्त व्हॉइस नोट्स शेअर करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. स्टेटस विभागात पेन्सिल व कॅमेऱ्यासह मायक्रोफोन हा तिसरा पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर रेकॉर्डिंग करून स्टेटस ठेवता येईल.

कोणाला मिळणार हे फीचर?

सध्या बीटा व्हर्जनमध्ये नवीन व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसची सुविधा आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉइड आवृत्ती 2.23.3.18 साठी बीटामध्ये नवीन पर्याय स्टेटस अपडेट्स विभागात उपलब्ध आहे. बीटा व्हर्जनवर ते यशस्वी झाल्यास ते सर्वत्र उपलब्ध करून दिले जाईल.

कसा करायचा वापर?

नवीन फीचर मिळवण्‍यासाठी आधी व्हॉट्सअ‍ॅपचं व्हर्जन अपडेट करावं लागेल. बीटा युजर्सनी अ‍ॅप उघडल्यानंतर स्टेटस विभागात जावे व खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.

  • स्टेटस सेक्शनमध्ये तळाशी उजवीकडे, तुम्हाला कॅमेरा आणि त्याच्यावर पेन्सिल चिन्ह दिसेल. तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ शेअर करायचा असेल तर कॅमेरा आयकॉनवर टॅप करा.
  • स्टेटसमध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग किंवा मजकूर जोडण्यासाठी, तुम्हाला पेन्सिल चिन्हावर क्लिक करा.
  • हे क्लिक केल्यावर मजकूर टाईप करण्यासाठी विंडो उघडेल, तिथं उजव्या बाजूला 'मायक्रोफोन'चं चिन्ह दिसेल.
  • हा आयकॉन प्रेस करून ठेवल्यावर तुम्हाला व्हॉइस रेकॉर्डिंग करता येईल.
  • केवळ ३० सेकंदांपर्यंत तुम्हाला व्हाइस रेकॉर्ड करा. ते झाल्यावर Send बटणावर टॅप करा. त्यानंतर तुमची व्हॉइस रेकॉर्डिंग स्टेटस अपडेट म्हणून शेअर होईल.
  • उजव्या बाजूला वर दिसणार्‍या 'कलर टूल' आयकॉनवर टॅप करून रेकॉर्डिंगच्या मागे दिसणारा रंग बदलता येतो. मात्र, स्टेटसमध्ये टेक्स्ट आणि ऑडिओ एकत्र शेअर करण्याचा पर्याय सध्या देण्यात आलेला नाही.
  • ज्यांच्याकडं नवं फीचर उपलब्ध आहे आणि ज्याचं व्हॉट्सअ‍ॅप अपडेटेड आहे, केवळ त्याच युजर्सना तुमचं आवाजाच्या स्वरूपातील स्टेटस दिसेल.

Hero Zoom : हिरोच्या या स्कूटरची ‘धूम’, किंमत ६८,५९९ रुपये, जाणून घ्या फिचर्स

WhatsApp channel

विभाग