मराठी बातम्या  /  बिझनेस  /  harsh goenka : संपूर्ण देशासाठी ‘नाटू नाटू' बजेट; हर्ष गोयंकांनी जोडला 'आरआरआर'शी संबंध

harsh goenka : संपूर्ण देशासाठी ‘नाटू नाटू' बजेट; हर्ष गोयंकांनी जोडला 'आरआरआर'शी संबंध

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 01, 2023 06:31 PM IST

harsh goenka on budget 2023 : आरपीजी समूहाला १ फेब्रुवारीला सादर केलेला अर्थसंकल्प का आवडला, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी समुह अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी आरआरआर चित्रपटाची उपमा दिली आहे.

natu natu songs HT
natu natu songs HT

Naatu Naatu Budget : आरपीजी समुहाला १ फेब्रुवारीला सादर केलेला अर्थसंकल्प का आवडला, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी समुह अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी आरआरआर चित्रपटाची उपमा दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जर आरआरआरमधील एपिक अँक्शन ड्रामामुळे भारताला पहिला गोल्डन ग्लोब अवाॅर्ड मिळण्यास मदत झाली तर २०२३ चा केंद्रीय अर्थसंकल्प संपूर्ण गोल्डन ग्लोब काबीज करण्यासाठी संपूर्ण देशाला मार्गावर आणेल, असे आरपीजी समुहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी आपले बजेटवर आपले मत व्यक्त करताना ट्विट केले.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प आरपीजी समुहाला का आवडला याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी ही मिश्किल उपमा वापरली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, आरपीजी समुहाला बजेट का आवडले ? कारण ते पुन्हा आरआरआर आहे. यात तीन आर म्हणजे रेल्वे, नवीकरणीय उर्जा (रिन्युएबल एनर्जी) आणि सुधारणा (रिफाॅर्म्स)

"संपूर्ण देशासाठी एक नाटू नाटू बजेट आम्हाला गोल्डन ग्लोब जिंकण्याच्या मार्गावर आणत आहे," असे त्यांनी लिहिले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये टॅक्स स्लॅबमधील बदलांसह पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रातील मोठ्या भांडवली खर्चाचा समावेश होता.

हर्ष गोयंका यांनी उल्लेख केलेल्या तीन आर मध्ये पहिला रेल्वेचा संदर्भ दिला होता.त्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात २.४ लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. ती गेल्या वर्षाच्या तुलनेत ६५.५ टक्क्यांनी वाढली आहे.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठी १०,२२२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, रामा प्रसाद गोएंका समूहामध्ये (आरपीजी) १५ कंपन्यांचा समावेश आहे. औद्योगिक आणि सेवा पुरवणाऱा हा समुह तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, टायर इत्यादी क्षेत्रात विस्तारीत आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग