मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tax Slab : नवी करप्रणाली की जूनी... पगारदार वर्गासाठी कोणता पर्याय चांगला ? जाणून घ्या

Tax Slab : नवी करप्रणाली की जूनी... पगारदार वर्गासाठी कोणता पर्याय चांगला ? जाणून घ्या

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 02, 2023 04:39 PM IST

New vs Old Tax Slabs : २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे शेवटचे संपूर्ण बजेट होते. सर्वसामान्य करदात्यांना अपेक्षित करसवलीच्या निर्णयाची घोषणा या बजेटमध्ये झाली आहे.

New tax slab HT
New tax slab HT

New vs Old Tax Slabs : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला बजेट सादर केले. २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वीचे मोदी सरकारचे हे शेवटचे बजेट होते. सर्वसामान्य करदात्यांना अपेक्षित करसवलीच्या निर्णयाची घोषणा या बजेटमध्ये झाली आहे.

अर्थमंत्र्यांच्या घोषणेनुसार, ७ लाख उत्पन्न असलेल्या करदात्याने जर नवी कर प्रणाली स्वीकारली तर त्याला कोणताही कर भरावा लागणार नाही. याप्रमाणे आता, सर्व करदात्यांपुढे आता दोन पर्याय आहेत .पहिल्या पर्यायात जूनी कर प्रणाली स्विकारावी आणि दुसऱा पर्याय म्हणजे नव्या कर प्रणालीअंतर्गत व्यवहार करावा. सध्याच्या परिस्थितीत कोणता पर्याय चांगला आहे, हे जाणून घेऊया -

नव्या कर प्रणालीचे फायदे

नव्या कर व्यवस्थेअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. तर ३ ते ६ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के, ६ ते ९ लाखावर १० टक्के , नऊ ते १२ लाखांवर १५ टक्के आणि १५ लाख व त्यावरील उत्प्न्नावर ३० टक्के कर लागणार आहे. त्यातही जर तुमचे उत्पन्न १५.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे तर त्यावर ५२,५०० रुपये स्टँर्डर्ड डिडक्शनही लागेल.

ही नवी कर प्रणाली अंतर्गत कर भरणाऱ्या करदात्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी लागणार आहे. एक तर तुमची बचत, जसे की एनपीएस, पीपीएफ यांवर मिळणाऱ्या सवलतींवर कोणतीही करसवलत क्लेम करु शकणार नाही. याचाच अर्थ, ८० सी, ८० डी, एचआरए अंतर्गत तुम्ही कर बचत करु शकणार नाही. दुसरीकडे, जर तुमचे उत्पन्न ७ लाखांपेक्षा एक रुपया जरी जास्त झाला तर तुम्हाला ठरलेल्या कर प्रणालीअंतर्गत कर भरावा लागणार आहे.

जूनी कर प्रणाली.

यंदाच्या वर्षी सरकारकडून जून्या कर प्रणालीमध्ये बदल करण्यात आलेला नाही. यामुळेच २.५० लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नाही. २.५ लाख ते ५ लाखांपर्यंत ५ टक्के, ५ लाख ते १० लाखांपर्यंत २० टक्के आणि १० लाख व त्यापुढील उत्पन्नावर३० टक्के कर लादण्यात येणार आहे. मात्र यात एनपीएस, पीपीएफ आदी योजनांअंतर्गत कर बचत करण्याचा पर्याय खुला असणार आहे. यामुळेच नव्या करव्यवस्था प्रणाली अवलंबण्यासाठी करदाते अजूनही तयार नाहीत.

आयटीआर फाईल करताना ही बाब ठेवा ध्यानात

आयकर रिटर्न दाखल करताना ही बाब ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे की, तुम्ही कोणत्या कर व्यवस्थेचा हिस्सा बनू इच्छित आहात. जर तुम्ही चूकूनही दोन पैकी एका पर्यायाची निवड केली नाही, तर बाय डिफाॅल्ट तुम्ही नव्या करप्रणालीचा हिस्सा बनून जाल. पगारदार वर्ग जून्या करप्रणालीतून नव्या कर प्रणालीत जाऊ शकतात. पण बिझनेस करणाऱ्या व्य्कींना हा पर्याय खुला नाही.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग