Zoom layoffs : झूमच्या १३०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, सीईओने लिहिली भावनिक पोस्ट
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Zoom layoffs : झूमच्या १३०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, सीईओने लिहिली भावनिक पोस्ट

Zoom layoffs : झूमच्या १३०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, सीईओने लिहिली भावनिक पोस्ट

Updated Feb 08, 2023 02:23 PM IST

Zoom layoffs : जागतिक आर्थिक मंदीमुळे अमेरिकन व्हिडिओ काॅल सेवा प्रदाता टेक कंपनी झूमने एका फटक्यात १३०० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कर्मचारी कपातीची घोषणा कंपनीचे सीईओ एरिक युआन यांनी पोस्ट लिहून केली आहे.

Zoom HT
Zoom HT

Zoom layoffs : जागतिक आर्थिक मंदीमुळे अमेरिकन व्हिडिओ काॅल सेवा प्रदाता टेक कंपनी झूमने एका फटक्यात १३०० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. या कंपनीची एकूण कार्यक्षमता १५ टक्के आहे.

सीईओने लिहिले पत्र

कंपनीचे सीईओ एरिक युआनने कंपनीच्या संकेतस्थळावर ब्लाॅग पोस्ट करत कर्मचारी कपातीची घोषणा केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जर तुम्ही अमेरिकास्थित झूमचे कर्मचाऱी आहात आणि कर्मचारी कपातीमध्ये तुमचा क्रमांक लागला असेल तर पुढील अर्ध्या तासात तुम्हाला तशा आशयाचा ईमेल मिळेल.

कर्मचाऱ्यांना मिळणार या सुविधा

कर्मचारी कपात झालेल्या कर्मचाऱ्यांचा उल्लेख त्यांनी मेहनती आणि कठोर परिश्रमी म्हणून केला आहे. या कर्मचाऱ्यांना कंपनी १६ आठवड्याचा पगार, स्वास्थ्य सुविधा आणि २०२३ चा वार्षिक बोनसही देणार आहेत. अमेरिकाबाहेरील कर्मचाऱ्यांनाही इथल्या नियमांनुसार मदत केली जाईल.

अमेरिकन शेअरबाजावरही परिणाम

झूमच्या कर्मचारी कपातीचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारावरही दिसून आला. मंगळवारी नॅसडॅकवर झूमच्या शेअर्सध्ये ८ टक्के वाढ झाली. कोविड १९ दरम्यान अनेक टेक कंपन्यांना अनपेक्षित वाढ मिळाली. जेंव्हा संपूर्ण जग घरी बसले होते,तेंव्हा झूमसारखी कंपनीची व्हिडिओ काॅलिंग सेवा जगभरातील लाखो लोकांनी वापरली होती. तेंव्हा झूमने या संधीचे सोने केले होते. दरम्यान, डेलने ६६०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे.

 

Whats_app_banner