मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  NCP Protest video: मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात राष्ट्रवादीचं मुंबईत जोरदार आंदोलन

NCP Protest video: मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात राष्ट्रवादीचं मुंबईत जोरदार आंदोलन

Dec 01, 2022, 05:31 PMIST

NCP Protest against Mangal prabhat Lodha: राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांनाही कैद करण्यात आलं होतं. परंतु शिवाजी महाराज जसे आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटले, त्याचप्रमाणे शिंदेही सुटले, असं लोढा म्हणाले आहेत. प्रतापगडावरील कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यामुळं नवा वाद सुरू झाला असून त्यांचा सर्वत्र निषेध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं आज मुंबईत लोढा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.