मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : सचिन तेंडुलकर स्माइल अ‍ॅम्बॅसेडर होताच देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Video : सचिन तेंडुलकर स्माइल अ‍ॅम्बॅसेडर होताच देवेंद्र फडणवीस म्हणाले…

May 30, 2023, 02:11 PMIST

Devendra Fadnavis : राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ मुख अभियानासाठी स्माइल अॅम्बेसेडर (Smile Ambassador) म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची (Sachin Tendulkar) नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षे ते नि:शुल्क हे काम करणार आहेत. स्वच्छ मुख अभियान हे एक ओरल हेल्थ मिशन आहे. सचिन तेंडुलकर यांच्यासारखे तरुणाईचे आवडते आहेत. ते दूत झाल्यानं हे मिशन राबवण्यात मोठा फायदा होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.