मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: मी मज हरपून बसले गं… स्वत:चा आवाज ऐकून नोराला राहावलं नाही! पाहा काय केलं!

Video: मी मज हरपून बसले गं… स्वत:चा आवाज ऐकून नोराला राहावलं नाही! पाहा काय केलं!

Dec 01, 2022, 09:48 AMIST

Nora Fatehi Dance Video : सध्या जगभरात ‘फिफा फुटबॉल वर्ल्डकप २०२२’चा जल्लोष पाहायला मिळतो आहे. फुटबॉल सामने पाहण्यासाठी आणि सोहळ्यात लाईव्ह सादरीकरणासाठी अभिनेत्री नोरा फतेही देखील कतारमध्ये पोहोचली आहे. स्वतः नोरा फुटबॉल स्टेडियममधील अपडेट्स चाहत्यांना देत आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नोरा आनंदाने नाचताना दिसत आहे. याला एक खास कारण आहे. फुटबॉलचा सामना चालू असताना चक्क नोरा फतेहीचं गाणं वाजलं आहे. आपला आवाज फुटबॉलच्या मैदानात घुमतोय हे पाहून नोराच्या आनंदाला उधाण आलं आणि तिने देखील या गाण्यावर ठेका धरला. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.