मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  कोल्हापूर : पैजारवाडीत चिले महाराजांचा जन्म शताब्दी सोहळा साजरा

कोल्हापूर : पैजारवाडीत चिले महाराजांचा जन्म शताब्दी सोहळा साजरा

Aug 18, 2022, 06:15 PMIST

  • कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी इथं परमपूज्य सद्गुरु चिले महाराजांचा जन्म शताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. कासवाकृती मंदिरात गेल्या आठवड्याभरापासून जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यता आले होते. दररोज काकड आरती, अभिषेक, त्रिकाल आरती, जप, गुरुचरित्र वाचन सुरू होते. आज दुपारी २ वाजता जन्मकाळ आणि पाळणा झाला. त्यानंतर सुंठवड्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.