मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  ‘भारत गौरव’ अंतर्गत पहिली खासगी रेल्वे कोयंबतूर ते शिर्डी रवाना, तिकीट दर किती?

‘भारत गौरव’ अंतर्गत पहिली खासगी रेल्वे कोयंबतूर ते शिर्डी रवाना, तिकीट दर किती?

Jun 16, 2022, 05:40 PMIST

भारत गौरव योजनेच्या अंतर्गत देशातील पहिली खासगी रेल्वे रवाना झाली आहे. ही रेल्वे, तामिळनाडूतील कोयंबतूर रेल्वे स्थानकाचून साई नगर शिर्डीकडे रवाना झाली. भारत गौरव योजनेतर्गत चालवल्या जाणारी ही रेल्वे गुरुवारी शिर्डीत दाखल होईल. दक्षिण रेल्वेचे सीपीआरओ बी. गुगनेसन यांनी सांगितले की, स्पेशल ट्रेन सेवेत जवळपास १५०० प्रवासी प्रवास करू शकतात. रेल्वेतील स्वच्छता व व्यवस्थापनाची जबाबदारी प्रायव्हेट सर्विस प्रोव्हायडरची आहे.