मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  VIDEO:हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यावरून ओवैसींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले..

VIDEO:हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यावरून ओवैसींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले..

May 18, 2022, 11:27 PMIST

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हार्दिक पटेल गुजरातमधील पाटीदार समाजाचा मोठा नेता आहे. हार्दिक पटेलच्या राजीनाम्यानंतर  AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ओवैसी यांनी म्हटले की, काँग्रेसने महाराष्ट्रात १५ वर्षे सरकार चालवले मात्र आता ते तिसऱ्या नंबरवरती फेकले गेले आहेत. दिल्लीत तर काँग्रेसचे नामोनिशाण नाही. कार्यकर्ते काँग्रेसला सोडून जात आहेत. गुजरातमधील कार्यकार्य अध्यक्षांवर कार्यकर्त्यांचा विश्वास नाही.