मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Year Ender 2022: विराट ते वॉर्नर... २०२२ मध्ये 'या' दिग्गजांनी शतकांचा दुष्काळ संपवला

Year Ender 2022: विराट ते वॉर्नर... २०२२ मध्ये 'या' दिग्गजांनी शतकांचा दुष्काळ संपवला

Dec 29, 2022, 03:45 PMIST

Year Ender 2022: अवघ्या २ दिवसांनंतर २०२२ हे वर्ष संपणार आहे. हे वर्ष काही खेळाडूंसाठी वाईट स्वप्नासारखे ठरले. तर काही खेळाडूंसाठी हे वर्ष अतिशय संस्मरणीय ठरले आहे. यामध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांचाही समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनीही यंदा शतकांचा दुष्काळ संपवला. तर २०२२ या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात न्युझीलंडचा दिग्गज केन विल्यमसन यानेही शतक ठोकून वर्षाचा शेवट गोड केला.

  • Year Ender 2022: अवघ्या २ दिवसांनंतर २०२२ हे वर्ष संपणार आहे. हे वर्ष काही खेळाडूंसाठी वाईट स्वप्नासारखे ठरले. तर काही खेळाडूंसाठी हे वर्ष अतिशय संस्मरणीय ठरले आहे. यामध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांचाही समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनीही यंदा शतकांचा दुष्काळ संपवला. तर २०२२ या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात न्युझीलंडचा दिग्गज केन विल्यमसन यानेही शतक ठोकून वर्षाचा शेवट गोड केला.
Virat Kohli- या यादीत पहिले नाव जगातील स्टार फलंदाजांपैकी एक विराट कोहलीचे आहे. विराटचे चाहते गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या शतकाची वाट पाहत होते. पण २०२२ च्या आशिया चषकात विराटने चाहत्यांची ही प्रतीक्षा संपवली. साडेतीन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने शतक ठोकले. तसेच, हे त्याचे पहिलेच टी-२० आंतरराष्ट्रीय शतक ठरले. त्याने आफगाणिस्तानविरुद्ध ६१ चेंडूत १२२ धावा केल्या होत्या.
(1 / 7)

Virat Kohli- टी-२० नंतर कोहलीने वनडेतही शतकाचा दुष्काळ संपवला. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने शानदार शतक झळकावले. या शतकानंतर त्याने रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकण्याच्या बाबतीत कोहली (७२) आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सचिन १०० शतकांसह पहिल्या नंबरवर आहे. 
(2 / 7)

Cheteshwar Pujara- चेतेश्वर पुजारा वर्षाच्या सुरुवातीला खराब फॉर्मात होता. त्यामुळे त्याला ड्रॉप करण्यात आले. त्यानंतर त्याने काऊंटी क्रिकेट खेळून आपला फॉर्म परत मिळवला. यानंतर, पुजाराने २०२२ वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तीन वर्षांनंतर शतक झळकावले. त्याने बांगलादेशविरुद्ध १३० चेंडूत १०२ धावा केल्या.
(3 / 7)

Steve Smith- या दोन भारतीय खेळाडूंशिवाय ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथसाठीही हे वर्ष छान ठरले. स्मिथने जुलै २०२२ मध्ये अनेक डावांनंतर शानदार शतक केले. श्रीलंकेविरुद्ध कठीण काळात त्याने हे शतक झळकावले. यानंतर त्याने आणखी दोन शतके झळकावली. ज्यामध्ये द्विशतकही एका द्विशतकाचाही समावेश आहे. 
(4 / 7)

David Warner- स्मिथचा सहकारी डेव्हिड वॉर्नरही अशाच परिस्थितीशी झुंजत होता. वॉर्नरने जानेवारी २०२० मध्ये भारताविरुद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर ६७ डाव खेळले पण शतक झळकावता आले नाही. वॉर्नरचा दुष्काळही २०२२ मध्येच संपला. वॉर्नरने १०४३ दिवसांनंतर नोव्हेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्न कसोटीत द्विशतक झळकावले.
(5 / 7)

Kane Williamson- न्युझीलंडच्या केन विल्यमसननेही अनेक दिवसांनंतर शतकी खेळी केली आहे. त्याने या महिन्यातच आपल्या कसोटी कर्णधारपदाचा राजानीमा दिला होता. त्यानंतर पहिल्याच कसोटीत त्याने पाकिस्ताविरुद्ध द्विशतक झळकावले आहे.  
(6 / 7)

Year Ender 2022
(7 / 7)
Year Ender 2022(all photos- instagram)

    शेअर करा