मराठी बातम्या  /  क्रीडा  /  सर्वात महागडी खेळाडू ठरतेय सुपर फ्लॉप, स्मृती मानधनाच्या नेतृत्वात आरसीबीची पराभवाची हॅट्ट्रिक

सर्वात महागडी खेळाडू ठरतेय सुपर फ्लॉप, स्मृती मानधनाच्या नेतृत्वात आरसीबीची पराभवाची हॅट्ट्रिक

Mar 10, 2023, 09:34 PM IST

    • WPL 2023 Smriti Mandhana : महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. तिच्या नेतत्वात संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात आरसीबीचा पराभव झाला आहे. संघात एलिस पेरी, हीदर नाईट, सोफी डिव्हाईनसारखे दिग्गज खेळाडू असतानाही संघाचा सामना जिंकण्यात अपयश येत आहे.
WPL 2023 Smriti Mandhana

WPL 2023 Smriti Mandhana : महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. तिच्या नेतत्वात संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात आरसीबीचा पराभव झाला आहे. संघात एलिस पेरी, हीदर नाईट, सोफी डिव्हाईनसारखे दिग्गज खेळाडू असतानाही संघाचा सामना जिंकण्यात अपयश येत आहे.

    • WPL 2023 Smriti Mandhana : महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. तिच्या नेतत्वात संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात आरसीबीचा पराभव झाला आहे. संघात एलिस पेरी, हीदर नाईट, सोफी डिव्हाईनसारखे दिग्गज खेळाडू असतानाही संघाचा सामना जिंकण्यात अपयश येत आहे.

Smriti Mandhana WPL 2023 : महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) थरार ४ मार्चपासून सुरू झाला आहे. WPL चे पहिलेच सीझन आहे. या मोसमात आतापर्यंत झालेल्या ८ सामन्यांमध्ये अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनेही आपल्या बॅटने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे, डब्ल्यूपीएल लिलावात सर्वात महागडी खेळाडू असलेली स्मृती मानधना आतापर्यंत फलंदाजी आणि कर्णधारपद या दोन्हीमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

सर्वात महागडी खेळाडू ठरतेय सुपर फ्लॉप

WPL लिलावात स्मृती मानधनाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ कोटी ४० लाख रुपये खर्चून संघात घेतले. यानंतर आरसीबीने तिला संघाचे कर्णधारपददेखील सोपवले. स्मृती मानधना कर्णधार आणि फलंदाज म्हणून चमकदार कामगिरी करेल अशी प्रत्येकाला अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत तिने दोन्ही बाबतीत पूर्णपणे निराश केले आहे.

आरसीबीची पराभवाची हॅट्ट्रिक

आरसीबी महिला संघाला या मोसमात आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे स्मृती मंधानाची बॅटिंगमधील कामगिरी पाहता तिने आतापर्यंत २० च्या सरासरीने ८० धावा केल्या आहेत. तिच्या कामगिरीचा परिणाम संघाच्या कामगिरीवरही दिसून आला आहे.

WPLच्या या सीझनमध्ये आरसीबीला त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ६० धावांनी पराभूत केले. यानंतर संघाचा दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने ९ विकेट्सने हरवले. त्यानंतर आरसीबीच्या तिसऱ्या सामन्यात त्यांना गुजरात जायंट्सने ११ धावांनी पराभूत केले. संघात अनेक मोठी नावे असूनही स्मृती माधनाला अद्याप तिच्या खेळाडूंकडून चांगली कामगिरी करवून घेता आलेली नाही.