मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Smriti Mandhana : नाव मोठं लक्षण खोटं... केएल राहुलप्रमाणेच मोठ्या सामन्यात फ्लॉप होते स्मृती मानधना

Smriti Mandhana : नाव मोठं लक्षण खोटं... केएल राहुलप्रमाणेच मोठ्या सामन्यात फ्लॉप होते स्मृती मानधना

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 25, 2023 11:12 AM IST

Smriti Mandhana Records In ICC Knockout Matches : भारतीय संघाने गेल्या १० वर्षांत एकूण ५ बाद फेरीचे सामने खेळले आहेत. या पाचही सामन्यांमध्ये सलामीवीर स्मृती मानधनाची बॅट चालली नाही. ती नॉक आउट सामन्यांमध्ये सातत्याने फ्लॉप ठरत आलेली आहे. पुरूष टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलचाही असाच काहीसा रेकॉर्ड आहे. तो देखील महत्वाच्या सामन्यांमध्ये विशेष कामगिरी करण्यास अपयशी ठरतो.

Smriti Mandhana
Smriti Mandhana

Smriti Mandhana record in Knockout Matches : भारतीय महिला क्रिकेट संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ५ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने गेल्या १० वर्षांत एकूण ५ बाद फेरीचे (नॉक आउट) सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे या पाचही सामन्यांमध्ये स्मृती मानधनाची बॅट चालली नाही.

यावेळी स्मृती मानधना उत्कृष्ट फॉर्ममध्ये होती. उपांत्य फेरीपूर्वी झालेल्या ३ सामन्यांमध्ये तिने १०, ५२ आणि ८७ धावा केल्या होत्या. सलग दोन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावल्यानंतर मनधनाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. यावेळी ती टीम इंडियाला उपांत्य फेरीत विजय मिळवून देईल, असे वाटत होते, पण तसे झाले नाही. ती केवळ २ धावा करून बाद झाली. मानधना तिच्या कारकिर्दीत पाचव्यांदा बाद फेरीचा सामना खेळत होती. या पाचही सामन्यात ती फ्लॉफ ठरली आहे. बाद फेरीच्या सामन्यात तिची सर्वोच्च धावसंख्या ३४ आहे.

महिला वनडे वर्ल्डकप २०१७ उपांत्य फेरी

२०१७ वनडे वर्ल्डकपमध्ये सेमी फायनल सामना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. या सामन्यात स्मृती मानधनाने ६ धावा केल्या होत्या. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४२ षटकांत २८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया ४०.१ षटकांत २४५ धावांत गारद झाला. हरमनप्रीत कौरने ११५ चेंडूत नाबाद १७१ धावा केल्या होत्या.

महिला वनडे वर्ल्डकप २०१७ फायनल

२०१७ वनडे वर्ल्डकपची फायनल भारत आणि इंग्लंड यांच्यात झाली. या सामन्यात इंग्लंडने ५० षटकात ७ बाद २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत २१९ धावाच करू शकला. स्मृती मानधना शुन्यावर बाद झाली.

महिला T20 विश्वचषक २०१८ उपांत्य फेरी

हा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात झाला. या सामन्यात स्मृती मानधना २३ चेंडूत ३४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. भारताने त्या सामन्यात ११२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १७ षटकात लक्ष्य गाठले.

महिला T20 विश्वचषक २०२० फायनल

२०२० ची महिला T20 विश्वचषकाची फायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाली. या सामन्यात २० षटकांत ४ बाद १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव ९९ धावांवर गारद झाला. स्मृती मानधना ८ चेंडूत केवळ ११ धावा करू शकली.

उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान होते. पावसामुळे सामना होऊ शकला नाही. भारताला गटात अव्वल असण्याचा फायदा झाला. ती प्रथमच आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली.

महिला T20 विश्वचषक २०२३ उपांत्य फेरी

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० षटकात ४ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला २० षटकांत ८ बाद १६७ धावाच करता आल्या. स्मृती मानधना पुन्हा एकदा बाद फेरीत अपयशी ठरली. तिला फक्त २ धावा करता आल्या.

WhatsApp channel