मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni Film : धोनीच्या चित्रपटाचा फर्स्ट लुक आला समोर, 'या' सुंदरीसोबत होणार डेब्यू

MS Dhoni Film : धोनीच्या चित्रपटाचा फर्स्ट लुक आला समोर, 'या' सुंदरीसोबत होणार डेब्यू

Jan 27, 2023, 11:44 PM IST

  • MS Dhoni production lets get married : भारतीय संघाला दोन विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता चित्रपट निर्मितीमध्ये उतरला आहे. पहिला तमिळ चित्रपट 'एलएसजी: लेट्स गेट मॅरीड' त्याच्या प्रोडक्शन धोनी एंटरटेनमेंट अंतर्गत तयार करण्यात आला आहे. 

MS Dhoni Production Film

MS Dhoni production lets get married : भारतीय संघाला दोन विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता चित्रपट निर्मितीमध्ये उतरला आहे. पहिला तमिळ चित्रपट 'एलएसजी: लेट्स गेट मॅरीड' त्याच्या प्रोडक्शन धोनी एंटरटेनमेंट अंतर्गत तयार करण्यात आला आहे.

  • MS Dhoni production lets get married : भारतीय संघाला दोन विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता चित्रपट निर्मितीमध्ये उतरला आहे. पहिला तमिळ चित्रपट 'एलएसजी: लेट्स गेट मॅरीड' त्याच्या प्रोडक्शन धोनी एंटरटेनमेंट अंतर्गत तयार करण्यात आला आहे. 

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी सध्या आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवण्याची तयारी सुरु केली आहे. हे त्याचे शेवटचे आयपीएल असू शकते असेही मानले जात आहे. आयपीएलला अलविदा करण्यापूर्वीच धोनीने चित्रपट निर्मितीत पाऊल टाकले आहे. धोनी एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या पहिल्या चित्रपटाचे मोशन पोस्टर शुक्रवारी प्रदर्शित झाले.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

लेट्स गेट मॅरीड (Let’s Get Married) असे या चित्रपटाचे नाव आहे. या तमिळ चित्रपटात साऊथचे स्टार्स दिसणार आहेत. धोनीच्या या ड्रीम प्रोजेक्टची मुख्य अभिनेत्री इव्हाना असेल. सोबतच हरीश कल्याण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश थमिलमणी असतील. रमेश यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. धोनीने अत्यंत कमी बजेटमध्ये पदार्पण केले आहे. म्हणजेच हा चित्रपट अत्यंत कमी बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.

थमिलमनी यांच्या मते, चित्रपटाची संकल्पना धोनीची पत्नी साक्षी धोनीची आहे. धोनी एंटरटेनमेंट कंपनी जानेवारी २०१९ मध्ये सुरू झाली आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसने आतापर्यंत ३ लघुपट बनवले आहेत.

धोनीचा सराव सुरू

साक्षी चित्रपटात व्यस्त आहे, तर एमएस धोनी आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहे. त्याने नेट प्रॅक्टिसही सुरू केली आहे. २६ जानेवारीच्या दिवशी तो टीम इंडियाला भेटण्यासाठी रांचीच्या स्टेडियममध्ये पोहोचला होता.