मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mohammad Rizwan: मोहम्मद रिझवानचा T20 मध्ये जलवा कायम, कोहलीचा मोठा विक्रम मोडला

Mohammad Rizwan: मोहम्मद रिझवानचा T20 मध्ये जलवा कायम, कोहलीचा मोठा विक्रम मोडला

Sep 21, 2022, 04:22 PM IST

    • Mohammad Rizwan-virat kohli pak vs eng t20: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ७ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने ६८ धावांची खेळी खेळली. मात्र, त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. पाकिस्तानचा या सामन्यात ६ विकेट्सनी पराभव झाला.
Mohammad Rizwan

Mohammad Rizwan-virat kohli pak vs eng t20: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ७ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने ६८ धावांची खेळी खेळली. मात्र, त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. पाकिस्तानचा या सामन्यात ६ विकेट्सनी पराभव झाला.

    • Mohammad Rizwan-virat kohli pak vs eng t20: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ७ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने ६८ धावांची खेळी खेळली. मात्र, त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. पाकिस्तानचा या सामन्यात ६ विकेट्सनी पराभव झाला.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ७ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. मात्र, पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानने या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मोहम्मद रिझवानने या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासोबतच रिझवानने जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीचा एक मोठा विक्रमही मोडीत काढला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मोहम्मद रिझवानने सर्वात जलद २ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या विक्रमात रिझवानने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रिझवानने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५२ व्या डावात २ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २ हजार धावा करण्याच्या बाबतीत रिझवानने बाबरची बरोबरी केली आहे.

तर विराट कोहलीने आपल्या T20 कारकिर्दीतील ५६ व्या डावात २ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. म्हणजेच, टी-२० मध्ये सर्वात जलद २ हजार धावा करण्याच्या बाबतीत बाबर आणि रिझवान कोहलीच्या पुढे आहेत.

मंगळवारी केएल राहुलनेही आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. राहुलने कारकिर्दीतील ५८ व्या डावात हा टप्पा गाठला. सर्वात जलद २००० धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने कारकिर्दीतील ६२ व्या डावात २ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.