मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Raju Srivastav: सर्वांना हसवणारे राजू रडवून गेले, 'या' क्रिकेटपटूंनी अशी वाहिली श्रद्धांजली

Raju Srivastav: सर्वांना हसवणारे राजू रडवून गेले, 'या' क्रिकेटपटूंनी अशी वाहिली श्रद्धांजली

Sep 21, 2022, 03:39 PM IST

    • Raju Srivastav Cricket Memory: दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या जाण्याने क्रिकेट जगतालाही दु:ख झाले आहे. राजू यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेक बड्या व्यक्तींनी राजू यांना पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
Raju Srivastav

Raju Srivastav Cricket Memory: दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या जाण्याने क्रिकेट जगतालाही दु:ख झाले आहे. राजू यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेक बड्या व्यक्तींनी राजू यांना पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

    • Raju Srivastav Cricket Memory: दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या जाण्याने क्रिकेट जगतालाही दु:ख झाले आहे. राजू यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेक बड्या व्यक्तींनी राजू यांना पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून ते कोमात होते. १० ऑगस्ट रोजी जिममध्ये कसरत करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. ४१ दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर राजू यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेक बड्या व्यक्तींनी राजू यांना पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये अनेक क्रिकेपटूंचाही समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

राजू यांच्या निधनावर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही ट्वीट केले आहे. वीरुने लिहिले ही, “ओम शांती, राजू भाई. एक सच्चा कॉमेडियन ज्याने निखळ विनोदाने लोकांना हसवले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी आहे.”

त्याच वेळी, माजी अष्टपैलू युवराज सिंगनेही राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. युवीने लिहिले की, "दुःख आहे की ज्याने आम्हाला हसवले त्याला स्वतःचा दुःखद अंत अनुभवावा लागला. राजू श्रीवास्तव खूप लवकर निघून गेला. जगाला तुमची नेहमीत आठवण येईल. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना."

सोबतच, टीम इंडियाचे माजी क्रिकेटर आणि सध्याचे क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा याने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, "राजू जी, तुम्हाला कधीही विसरता येणार नाही... आम्ही जेव्हाही हसू तेव्हा तुमची आठवण येईल. ओम शांती."

माजी डावखुरा फलंदाज आणि मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेला सुरेश रैना यानेही राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. रैनाने लिहिले आहे की, "स्टॅंड अप कॉमेडी दिग्गज राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झाले. तुम्ही संपूर्ण देशाला खळखळून हसवले. ओम शांती."

पुढील बातम्या