मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MI vs SRH : ग्रीनचं वादळी शतक, हैदराबादचं २०१ धावांचं लक्ष्य मुंबईनं १८ षटकात गाठलं, राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

MI vs SRH : ग्रीनचं वादळी शतक, हैदराबादचं २०१ धावांचं लक्ष्य मुंबईनं १८ षटकात गाठलं, राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

May 21, 2023, 07:33 PM IST

    • MI vs SRH Highlights : मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबईला विजयासाठी २०१ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते, जे रोहित शर्माच्या संघाने १८ षटकात सहज गाठले.
MI vs SRH Highlights

MI vs SRH Highlights : मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबईला विजयासाठी २०१ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते, जे रोहित शर्माच्या संघाने १८ षटकात सहज गाठले.

    • MI vs SRH Highlights : मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबईला विजयासाठी २०१ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते, जे रोहित शर्माच्या संघाने १८ षटकात सहज गाठले.

MI vs SRH Highlights : आयपीएल 2023 च्या ६९व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर २१ मे (रविवार) रोजी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबईला विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी १८ षटकांत पूर्ण केले. मुंबईच्या विजयाचा हिरो कॅमेरून ग्रीन ठरला, ज्याने नाबाद १०० धावा केल्या.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्या षटकातच इशान किशनची विकेट गमावली. इशान (१४ धावा) भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रूककरवी झेलबाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांनी १२८ धावांची शानदार शतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सांभाळला. रोहित शर्माने ३७ चेंडूंत ८ चौकार आणि १ षटकारासह ५६ धावा केल्या.

येथून ग्रीन आणि सूर्यकुमार यादवच्या नाबाद ५३ धावांच्या भागीदारीने मुंबईला विजय मिळवून दिला. सूर्यकुमारने १६ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या. ग्रीनने केवळ ४७ चेंडूत १०० धावा केल्या, ज्यात ८ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. ग्रीनचे टी-20 कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे.

हैदराबादचा डाव

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली, आयपीएलमध्ये पदार्पण डाव खेळण्यासाठी उतरलेल्या वीव्रांत शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी १३.५ षटकांत १४० धावांची भागीदारी केली. विव्रतने ४७ चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ६९ धावा केल्या. त्याचवेळी मयंक अग्रवालने ४६ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. यादरम्यान मयंकने आठ चौकार आणि चार षटकार मारले.

विव्रंत शर्मा बाद झाल्यानंतर सनरायझर्सने ठराविक अंतराने विकेट गमावल्या, त्यामुळे त्यांना पाच विकेट्सवर २०० धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईतर्फे आकाश मधवालने शानदार गोलंदाजी करताना ४ विकेट घेतल्या. त्याच वेळी ख्रिस जॉर्डनला एक विकेट मिळाला.