मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023: केकेआरच्या संघाला तगडा झटका; आयपीएल अर्ध्यावर सोडून स्टार खेळाडू मायदेशात परतला

IPL 2023: केकेआरच्या संघाला तगडा झटका; आयपीएल अर्ध्यावर सोडून स्टार खेळाडू मायदेशात परतला

Apr 28, 2023, 07:37 PM IST

  • Kolkata Knights Riders: कौटुंबिक कारणांमुळे कोलकाता संघाचा स्टार फलंदाज आपल्या मायदेशात परतला आहे.

KKR

Kolkata Knights Riders: कौटुंबिक कारणांमुळे कोलकाता संघाचा स्टार फलंदाज आपल्या मायदेशात परतला आहे.

  • Kolkata Knights Riders: कौटुंबिक कारणांमुळे कोलकाता संघाचा स्टार फलंदाज आपल्या मायदेशात परतला आहे.

Litton Das: आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला तगडा झटका लागला आहे. संघाचा स्टार फलंदाज लिटन दास कौटुंबिक कारणांमुळे मायदेशी परतला आहे. त्याची आयपीएलमधील उर्वरित सामन्यात खेळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्याला फक्त ४ मे २०२३ पर्यंत एनओसी जारी केला. लिटन दास अतिशय प्रभावी खेळाडू असून त्याच्याकडे सामना फिरवण्याची क्षमता आहे. आयपीएलच्या पुढील सामन्यात लिटन दासचे संघात असणे, कोलकाताच्या संघासाठी महत्त्वाचे होते. त्याचे संघाबाहेर असणे कोलकाताच्या संघाला मोठा धक्का असू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

आयपीएलच्या लिलावात कोलकाताच्या संघाने लिटन दासवर ५० लाखांची बोली लावली होती. दिल्लीविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने कोलकाताच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. या सामन्यात लिटन दासने चार चेंडूत चार धावा केल्या.

लिटन दासला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आयर्लंड दौऱ्यावर बांगलादेशच्या संघासोबत जायचे आहे. कोलकाताच्या संघाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की," कौटुंबिक कारणांमुळे लिटन दासला आज सकाळी बांगलादेशला जावे लागले. या कठीण काळात आम्ही त्याच्या कुटुंबियांसोबत आहोत."

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. या हंगामात खेळल्या गेलेल्या आठ सामन्यापैकी कोलकाताच्या संघाला फक्त तीन सामने जिंकता आले. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाताचा संघ सहा गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी कोलकाताच्या संघाला त्यांच्या पुढील सामन्यात चांगला खेळ दाखवावा लागेल.

विभाग