मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  India vs Ireland: दिसतंय तेवढं सोप नाही, 'हे' ५ खेळाडू भारताचा खेळ बिघडवू शकतात

India vs Ireland: दिसतंय तेवढं सोप नाही, 'हे' ५ खेळाडू भारताचा खेळ बिघडवू शकतात

Jun 24, 2022, 06:16 PMIST

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताच संघ आयर्लंड दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात भारताला दोन टी-२० सामनने खेळायचे आहेत. पहिला सामना २६ जून तर दुसरा सामना २८ जून रोजी होणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संघाला आयर्लंडकडून कडवी टक्कर मिळू शकते. कारण यजमान संघात असे काही जबरदस्त खेळाडू आहेत जे त्यांना अनुकुल असलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात.

  • हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताच संघ आयर्लंड दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात भारताला दोन टी-२० सामनने खेळायचे आहेत. पहिला सामना २६ जून तर दुसरा सामना २८ जून रोजी होणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संघाला आयर्लंडकडून कडवी टक्कर मिळू शकते. कारण यजमान संघात असे काही जबरदस्त खेळाडू आहेत जे त्यांना अनुकुल असलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात.
टीम इंडियाचे सीनियर खेळाडू हे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत. त्यामुळे या संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहेय. हार्दिक पहिल्यांदाच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.
(1 / 6)
टीम इंडियाचे सीनियर खेळाडू हे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत. त्यामुळे या संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहेय. हार्दिक पहिल्यांदाच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.(hindustan times)
अँड्र्यू बालबर्नी - अँड्र्यू बालबर्नी हा आयर्लंडचा कर्णधार आहे. त्याने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या मालिकेत चांगली कामिगीर करण्याची जबाबदारी ही बालबर्नी याच्यावर असणार आहे. ३१ वर्षीय अँड्र्यू बालबर्नीने आपल्या देशासाठी एकूण ६७ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर १४२९ धावा जमा आहेत.
(2 / 6)
अँड्र्यू बालबर्नी - अँड्र्यू बालबर्नी हा आयर्लंडचा कर्णधार आहे. त्याने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या मालिकेत चांगली कामिगीर करण्याची जबाबदारी ही बालबर्नी याच्यावर असणार आहे. ३१ वर्षीय अँड्र्यू बालबर्नीने आपल्या देशासाठी एकूण ६७ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर १४२९ धावा जमा आहेत.(hindustan times)
गॅरेथ डेलनी- वेगाने धावा काढणे ही गॅरेथ डेलनी याची खासियत आहे. २०१९ मध्ये पदार्पण केल्यापासून ते आतापर्यंत डेलानी हा आयरिश टी-२० संघाचा नियमित सदस्य आहे. डेलनीने ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६९४ धावा केल्या आहेत ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
(3 / 6)
गॅरेथ डेलनी- वेगाने धावा काढणे ही गॅरेथ डेलनी याची खासियत आहे. २०१९ मध्ये पदार्पण केल्यापासून ते आतापर्यंत डेलानी हा आयरिश टी-२० संघाचा नियमित सदस्य आहे. डेलनीने ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६९४ धावा केल्या आहेत ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.(hindustan times)
पॉल स्टर्लिंग - पॉल स्टर्लिंग हा आयरिश संघातील सर्वात अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. पॉल स्टर्लिंग हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्यावर या मालिकेत मोठी जबाबदारी असेल. स्टर्लिंगने १०२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने २ हजार ७७६ धावा केल्या आहेत. स्टर्लिंगने टी-२० फॉरमॅटमध्ये २० अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे. तसेच त्याने २० विकेट्स घेतल्या आहेत.
(4 / 6)
पॉल स्टर्लिंग - पॉल स्टर्लिंग हा आयरिश संघातील सर्वात अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. पॉल स्टर्लिंग हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्यावर या मालिकेत मोठी जबाबदारी असेल. स्टर्लिंगने १०२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने २ हजार ७७६ धावा केल्या आहेत. स्टर्लिंगने टी-२० फॉरमॅटमध्ये २० अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे. तसेच त्याने २० विकेट्स घेतल्या आहेत.(hindustan times)
मार्क अडायर- वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू मार्क अडायरने आतापर्यंत अनेकांना खूप प्रभावित केले आहे. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने ३९ सामन्यांमध्ये ७.०७ च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने ५९ बळी मिळवले आहेत. डेथ ओव्हर्समध्ये अप्रतिम यॉर्कर टाकण्याची स्कील ही अडायरची ताकद आहे.
(5 / 6)
मार्क अडायर- वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू मार्क अडायरने आतापर्यंत अनेकांना खूप प्रभावित केले आहे. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने ३९ सामन्यांमध्ये ७.०७ च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने ५९ बळी मिळवले आहेत. डेथ ओव्हर्समध्ये अप्रतिम यॉर्कर टाकण्याची स्कील ही अडायरची ताकद आहे.(instagram, mark adair)
कर्टिस कॅम्पफर - कर्टिस केम्पफर हा ऑसराऊंडर खेळाडू आहे. टी-२० कारकिर्दीत त्याने आतापर्यंत चांगली छाप पाडली आहे. २३ वर्षीय कर्टिस कॅम्फरने संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या २०२१ च्या टी-२० विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्धच्या सलग चार विकेट घेतल्या होत्या. कॅम्परने १२ सामन्यांत १६९ धावा केल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजीत १५ बळी घेतले आहेत.
(6 / 6)
कर्टिस कॅम्पफर - कर्टिस केम्पफर हा ऑसराऊंडर खेळाडू आहे. टी-२० कारकिर्दीत त्याने आतापर्यंत चांगली छाप पाडली आहे. २३ वर्षीय कर्टिस कॅम्फरने संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या २०२१ च्या टी-२० विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्धच्या सलग चार विकेट घेतल्या होत्या. कॅम्परने १२ सामन्यांत १६९ धावा केल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजीत १५ बळी घेतले आहेत.(hindustan times)

    शेअर करा