मराठी बातम्या  /  क्रीडा  /  DC Vs MI WPL Highlights : मुंबई इंडियन्स चॅम्पियन! फायनलमध्ये दिल्लीचा पराभव, सीव्हर ब्रंटचं अर्धशतक

DC Vs MI WPL Highlights : मुंबई इंडियन्स चॅम्पियन! फायनलमध्ये दिल्लीचा पराभव, सीव्हर ब्रंटचं अर्धशतक

Mar 26, 2023, 08:11 PM IST

  • DC Vs MI WPL Live Score : महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम आज संपला आहे. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ७ विकेट्सनी पराभव केला. हरनप्रीत कौरच्या संघाने पहिल्या सीझनचे विजेतेपद पटकावले आहे. 

DC Vs MI WPL Live Score

DC Vs MI WPL Live Score : महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम आज संपला आहे. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ७ विकेट्सनी पराभव केला. हरनप्रीत कौरच्या संघाने पहिल्या सीझनचे विजेतेपद पटकावले आहे.

  • DC Vs MI WPL Live Score : महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम आज संपला आहे. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ७ विकेट्सनी पराभव केला. हरनप्रीत कौरच्या संघाने पहिल्या सीझनचे विजेतेपद पटकावले आहे. 

WPL Live Cricket Score, DC vs MI Final Women’s Premier League 2023 : महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम आज संपला आहे. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ७ विकेट्सनी पराभव केला. हरनप्रीत कौरच्या संघाने पहिल्या सीझनचे विजेतेपद पटकावले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

DC Vs MI WPL Final Score updates

मुंबई चॅम्पियन

इंग्लंडची अनुभवी खेळाडू नताली सीव्हर ब्रंटने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवले आहे. तिने ५५ चेंडूत नाबाद ६० धावांची झुंजार खेळी करून संघाला विजेतेपद पटकावून दिले.

 दिल्लीने २० षटकांत ९ विकेट गमावून १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.३ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात १३४ धावा करून सामना जिंकला. मुंबई फ्रँचायझीच्या खात्यातील ही सहावी ट्रॉफी आहे. त्यांचा पुरुष संघ आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियन बनला आहे.

नतालीने अमेलिया केरसोबत चौथ्या विकेटसाठी २० चेंडूत नाबाद ३९ धावांची भागीदारी केली. अमेलिया केर आठ चेंडूत १४ धावा करून नाबाद राहिली. नतालीने याआधी कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ७४ चेंडूत ७२ धावांची भागीदारी केली होती. हरमनप्रीत ३९ चेंडूत ३७ धावा करून बाद झाली. हिली मॅथ्यूजने १३ आणि यास्तिका भाटियाने चार धावा केल्या. दिल्लीकडून राधा यादव आणि जेस जोनासेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दिल्लीचा डाव

दिल्ली कॅपिटल्सबद्दल बोलायचे झाले तर एके काळी त्यांच्या ९ विकेट ७९ धावांत पडल्या होत्या. संघाला १०० धावांचा टप्पाही गाठता येणार नाही, असे वाटत होते. तिथून शिखा पांडे आणि राधा यादवने डाव सांभाळला. दोघींनी शेवटच्या विकेटसाठी २४ चेंडूत नाबाद ५२ धावांची भागीदारी केली. राधाने १२ चेंडूत नाबाद २७ तर शिखाने १७ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. राधाने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी शिखाच्या बॅटमधून तीन चौकार बाहेर पडले. तिने एख षटकारही मारला.

या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी निराशा केली. कर्णधार मेग लॅनिंग वगळता कोणीही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाही. लॅनिंगने २९ चेंडूत ३५ धावा केल्या. ती दुर्दैवाने धावबाद झाली. मारिजन कॅपने १८ आणि शेफाली वर्माने ११ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून इस्सी वाँग आणि हीली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन बळी घेतले. अमेलिया केरला दोन बळी मिळाले.

DC Vs MI WPL Final Live Score : मुंबईला मोठा धक्का

१७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुंबईला मोठा धक्का बसला. कर्णधार हरमनप्रीत कौर ३९  चेंडूत ३७ धावा करून धावबाद झाली. शिखा पांडेच्या थ्रोवर धावबाद झाली.

DC Vs MI WPL Final Live Score : मुंबईला चार षटकांत ३७ धावांची गरज

मुंबई इंडियन्सच्या संघाने १६ षटकांत २ बाद ९५ धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी २४ चेंडूत ३७ धावा करायच्या आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौर ३८ चेंडूत ३७ आणि नताली सीव्हर ब्रंट ४३ चेंडूत ३५ धावा करून खेळत आहे. दोघींमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ७४ चेंडूत ७२ धावांची भागीदारी झाली.

DC Vs MI WPL Final Live Score : पॉवरप्लेमध्ये मुंबई २७/२

मुंबईच्या डावाचा पॉवरप्ले संपला आहे. त्यांनी सहा षटकांत दोन बाद २७ धावा केल्या आहेत. नताली सीव्हर ब्रंट १७ चेंडूत सहा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर चार चेंडूत दोन धावा करून खेळत आहे. मुंबईला विजयासाठी ८४ चेंडूत १०५ धावा करायच्या आहेत.

DC Vs MI WPL Final Live Score : मुंबईला पहिला धक्का

राधा यादवने दिल्ली कॅपिटल्सला पहिले यश मिळवून दिले. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तिने यास्तिका भाटिया एलिस कॅप्सीकरवी सीमारेषेवर झेलबाद झाली. यास्तिकाने तीन चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने चार धावा केल्या. मुंबईने तीन षटकात एक विकेट गमावत २१ धावा केल्या आहेत. हीली मॅथ्यूज १३ आणि नताली सीव्हर ब्रंट चार धावा करून खेळत आहेत.

DC Vs MI WPL Final Live Score : दिल्लीच्या १३१ धावा

दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी १३२ धावांचे लक्ष्य दिले आहे. दिल्लीने २० षटकांत नऊ बाद १३१ धावा केल्या. ७९ धावांत ९ फलंदाज गमावल्यानंतर शिखा पांडे आणि राधा यादव यांनी अखेरच्या विकेटसाठी २४ चेंडूत नाबाद ५२ धावांची भागीदारी केली. राधाने १२ चेंडूत नाबाद २७ तर शिखाने १७ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. राधाने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी शिखाच्या बॅटमधून तीन चौकार बाहेर पडले. तिने एक षटकारही मारला.

तत्पूर्वी या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी निराशा केली. कर्णधार मेग लॅनिंग वगळता कोणीही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाही. लॅनिंगने २९ चेंडूत ३५ धावा केल्या. ती दुर्दैवाने धावबाद झाली. मारिजन कॅपने १८ आणि शेफाली वर्माने ११ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून इस्सी वाँग आणि हीली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन बळी घेतले. अमेलिया केरला दोन बळी मिळाले.

DC Vs MI WPL Final Live Score : अरुंधती आणि जोनासेनही बाद

अरुंधती रेड्डीच्या रूपाने दिल्ली कॅपिटल्सला सहावा धक्का बसला. पाच चेंडूंचा सामना केल्यानंतर तिला खातेही उघडता आले नाही. अरुंधतीला अमेलिया केरने सायका इशाकच्या हाती झेलबाद केले. 

यानंतर दिल्लीला सातवा धक्का जेस जोनासेनच्या रूपाने बसला. हिली मॅथ्यूजने तिच्याच गोलंदाजीवर तिचा झेल घेतला. जोनासेनला ११ चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या. दिल्ली कॅपिटल्सने १४ षटकांत सात गडी गमावून ७७ धावा केल्या आहेत. शिखा पांडे आणि मिन्नू मणी क्रीजवर आहेत.

 DC Vs MI WPL Final Live Score : मेग लॅनिंग बाद 

दिल्ली कॅपिटल्सला अंतिम सामन्यात ५ वा मोठा धक्का बसला. कर्णधार मेग लॅनिंग ३५ धावा करून धावबाद झाली. दिल्ली कॅपिटल्सचा निम्मा संघ ७४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

DC Vs MI WPL Final Live Score : जेमिमाह बाद 

इस्सी वोंगने दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का दिला. तिने पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जेमिमा रॉड्रिग्जला बाद केले. जेमिमा देखील तिच्या आधीच्या दोन सहकारी (शेफाली आणि कॅप्सी) फलंदाजांप्रमाणेच पूर्ण टॉस बॉलवर बाद झाली. आठ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने ९ धावा करून ती हिली मॅथ्यूजकडे झेलबाद झाली. जेमिमा बाद झाल्यानंतर मारिजन कॅप क्रीजवर आली.

DC Vs MI WPL Final Live Score : एलिस कप्सी बाद

दुसऱ्या षटकात इस्सी वोंगने मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. तिने पाचव्या चेंडूवर एलिस कॅप्सीला बाद केले. कॅप्सीही वोंगच्या फुल टॉस बॉलचा बळी ठरली. तिने हा झेल अमनजोत कौरकडे सोपवला. तिला खाते उघडता आले नाही. दिल्लीने दोन षटकांत दोन बाद १६ धावा केल्या आहेत. जेमिमा आणि मेग लॅनिंग खेळत आहेत.

DC Vs MI WPL Final Live Score : वॉंगने शेफालीला बाद केले

दिल्ली कॅपिटल्सला दुसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. इस्सी वोंगच्या तिसऱ्या चेंडूवर शफाली वर्मा झेलबाद झाली.  शेफाली ११ चेंडूत ४ धावा करून बाद झाली.

DC Vs MI WPL Final Live Score : दिल्लीचा डाव सुरू 

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा डाव सुरु झाला आहे. शफाली वर्माने कर्णधार मेग लॅनिंगसह डावाची सुरुवात केली आहे. मुंबईसाठी नताली सीव्हर ब्रंटने गोलंदाजीची सुरुवात केली.

DC Vs MI WPL Final Live Score : दोन्ही संघ 

दिल्ली कॅपिटल्स - मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, एलिस कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे, मिन्नू मणी

मुंबई इंडियन्स - यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सीव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलीया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक

DC Vs MI WPL Final Live Score : दिल्लीची प्रथम फलंदाजी

महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीत कौरचा संघ प्रथम गोलंदाजी करेल. मुंबईने संघात एकही बदल केलेला नाही.

DC Vs MI WPL Final Live : मुंबई इंडियन्स फ्रँचायझीकडे पाच जेतेपदं 

मुंबई इंडियन्स फ्रँचायझीकडे पाच जेतेपदे आहेत. आयपीएलमध्ये (dc vs mi ipl final) त्यांच्या पुरुष संघाने पाच वेळा स्पर्धा जिंकली आहे. आता महिला संघ या यादीत आणखी एक ट्रॉफी जोडण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकलेले नाही. त्यांचा संघ आयपीएलमध्ये फायनल खेळला आहे, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीला पहिले विजेतेपद मिळण्याची अपेक्षा आहे.