मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG 2022: राष्ट्रकुलसाठी गेलेले भारतीय खेळाडू ‘या’ गावांत राहणार; काय आहेत नियम?

CWG 2022: राष्ट्रकुलसाठी गेलेले भारतीय खेळाडू ‘या’ गावांत राहणार; काय आहेत नियम?

Jul 22, 2022, 05:06 PM IST

    • राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचे २१५ खेळाडू सहभागी होत आहेत. प्रशिक्षक आणि संघ अधिकाऱ्यांसह एकूण ३२५ सदस्य इंग्लंडमध्ये राहणार आहेत. पाच वेगवेगळ्या गावात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Commonwealth Games

राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचे २१५ खेळाडू सहभागी होत आहेत. प्रशिक्षक आणि संघ अधिकाऱ्यांसह एकूण ३२५ सदस्य इंग्लंडमध्ये राहणार आहेत. पाच वेगवेगळ्या गावात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

    • राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचे २१५ खेळाडू सहभागी होत आहेत. प्रशिक्षक आणि संघ अधिकाऱ्यांसह एकूण ३२५ सदस्य इंग्लंडमध्ये राहणार आहेत. पाच वेगवेगळ्या गावात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Commonwealth Games 2022: भारतीय खेळाडू २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. या महिन्यात २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमधील बर्मिंघम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. या खेळांसाठी ३२२ सदस्यीय भारतीय संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) या संघात २१५ खेळाडूंचा समावेश केला आहे. तर १०७ अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी असतील.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

भारतीय खेळाडूंची ५ वेगवेगळ्या गावात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सामान्यतः राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना एकाच गावात राहण्याची सोय केली जाते, मात्र यावेळी या स्पर्धेत ५ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत असून त्यांच्या राहण्याची व्यवस्था ५ वेगवेगळ्या गावात करण्यात आली आहे. येथे येणार्‍या प्रत्येक खेळाडूला RT-PCR चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट द्यावा लागणार आहे.

कोणत्या खेळाचे खेळाडू कुठे राहतील?

कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज बर्मिंगहॅम: जलतरण, ऍथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, स्क्वॅश आणि हॉकी.

कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज NEC: बॅडमिंटन, बॉक्सिंग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग आणि ट्रायथलॉन.

कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज वॉर्विक: कुस्ती, ज्युडो आणि लॉन बॉल.

कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज सिटी सेंटर: महिला क्रिकेट संघ.

महिला क्रिकेट संघाचे सर्व सामने एजबॅस्टन मैदानावर होणार आहेत. 

खेळाडूंसाठी काय नियम आहेत?

प्रत्येक खेळाडूंना कोणताही अधिकारी, प्रशिक्षक, इतर खेळाडू किंवा प्रेक्षक यांच्याविरुद्ध नकारात्मक किंवा आक्षेपार्ह विधाने करता येणार नाहीत. या सोबतच त्यांना चांगल्या खेळ भावनेला प्रोत्साहन द्यावे लागेल. सर्व खेळाडूंना डोपिंगचे परिणाम, धोके आणि त्याच्या परिणामांची जाणीव असणे आवश्यक आहे.