मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG 2022: भारताला हॉकीत एकही सुवर्ण पदक नाही; पाहा आतापर्यंतची कामगिरी

CWG 2022: भारताला हॉकीत एकही सुवर्ण पदक नाही; पाहा आतापर्यंतची कामगिरी

Jul 21, 2022, 08:05 PM IST

    • भारताने गेल्या वर्षी ४१ वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. २०१० (दिल्ली) आणि २०१४ (ग्लासगो) मध्ये भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी होती. भारताने दोन्ही वेळा रौप्यपदक जिंकले होते. मात्र, यंदा कर्णधार मनप्रीत सिंगचा संघ बर्मिंगहॅममध्ये पहिले सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
CWG 2022

भारताने गेल्या वर्षी ४१ वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. २०१० (दिल्ली) आणि २०१४ (ग्लासगो) मध्ये भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी होती. भारताने दोन्ही वेळा रौप्यपदक जिंकले होते. मात्र, यंदा कर्णधार मनप्रीत सिंगचा संघ बर्मिंगहॅममध्ये पहिले सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

    • भारताने गेल्या वर्षी ४१ वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. २०१० (दिल्ली) आणि २०१४ (ग्लासगो) मध्ये भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी होती. भारताने दोन्ही वेळा रौप्यपदक जिंकले होते. मात्र, यंदा कर्णधार मनप्रीत सिंगचा संघ बर्मिंगहॅममध्ये पहिले सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

ऑलिम्पिकमध्ये ८ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत एकही सुवर्णपदक पटकावता आलेले नाही. १९९८ मध्ये या खेळांमध्ये हॉकीचा समावेश करण्यात आला.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

कॉमनवेल्थ गेम्स हॉकीमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सर्व ६ सुवर्णपदके जिंकली आहेत. मात्र, यंदा कर्णधार मनप्रीत सिंगचा संघ बर्मिंगहॅममध्ये पहिले सुवर्णपदक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व मोडून काढण्याचा प्रयत्न करेल.

गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ४१ वर्षांनंतर कांस्यपदक जिंकले होते. २०१० (दिल्ली) आणि २०१४ (ग्लासगो) मध्ये भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी होती. भारताने दोन्ही वेळा रौप्यपदक जिंकले होते. १९९८ आणि २०१८ मध्ये भारत चौथ्या क्रमांकावर होता.

चांगल्या फिटनेसचा फायदा होऊ शकतो- 

यापूर्वी भारतीय संघ फिटनेसच्या बाबतीत कमकुवत मानला जात होता. आता भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. बर्मिंगहॅममध्ये चांगल्या फिटनेसचा भारताला फायदा होऊ शकतो. FIH प्रो लीगमध्ये भारताने बेल्जियम आणि नेदरलँड्सच्या मागे तिसरे स्थान पटकावले होते. भारतीय खेळाडूंनी पूर्ण क्षमतेने खेळ केला तर त्यांना बर्मिंगहॅममध्ये सुवर्ण जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

या संघांविरुद्ध होणार चुरशीची टक्कर-

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सर्वच हॉकी संघ मजबूत आहेत. ऑस्ट्रेलियाशिवाय कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि कॅनडा यांच्यासोबत भारताची कडवी झुुज होणार आहे. भारतीय संघ ब गटात आहे. त्यात इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घानाचे संघ आहेत. अ गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे.

पेनल्टी कॉर्नर, भारताची मजबूत बाजू-

उपकर्णधार हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, वरुण कुमार आणि युवा जुगराज सिंग यांच्या उपस्थितीत भारताकडे मजबूत पेनल्टी कॉर्नर आहे. संघ पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करू शकतो. भारताकडे जगातील सर्वोत्तम गोलरक्षक पीआर श्रीजेश देखील आहे.

तसेच, यावेळी भारताला सुवर्ण जिंकण्याची मोठी संधी असल्याचे मत माजी कर्णधार आणि प्रशिक्षक सरदार सिंग यांनी व्यक्त केले आहे. संघाचा आत्मविश्वासही वाढला आहे. सोबतच ‘आम्ही प्रत्येक सामन्यात ताकदीने उतरू,’ असे बचावपटू सुरेंदर कुमार म्हणाला. भारताचा पहिला सामना ३१ जुलै रोजी घानाविरुद्ध आहे.

भारताचा १८ सदस्यीय हॉकी संघ-

गोलरक्षक: पीआर श्रीजेश आणि कृष्ण बहादूर पाठक

बचावपटू: वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग आणि जर्मनप्रीत सिंग

मिडफिल्डर: मनप्रीत सिंग (कर्णधार), हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, समशेर सिंग, आकाशदीप सिंग आणि नीलकांत शर्मा

फॉरवर्ड्स: मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, गुरजंत सिंग आणि अभिषेक.

 

कॉमनवेल्थमध्ये भारतीय पुरुष संघाचे सामने- 

३१ जुलै : भारत वि घाना

१ ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड

३ ऑगस्ट : भारत विरुद्ध कॅनडा

४ ऑगस्ट: भारत विरुद्ध वेल्स

विभाग