मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Commonwealth Games 2022: ‘हे’ भारतीय खेळाडू आहेत सुवर्ण पदकाचे दावेदार

Commonwealth Games 2022: ‘हे’ भारतीय खेळाडू आहेत सुवर्ण पदकाचे दावेदार

Jul 16, 2022, 06:46 PMIST

राष्ट्रकुल २०२२ स्पर्धा (Commonwealth Games 2022) तोंडावर आली आहे. २८ जुलैपासून बर्मिंगहममध्ये या खेळांना सुरुवात होणार आहे. स्पर्धेत भारताचा २१५ सदस्यीय संघ सामील होणार आहे. यात १०८ पुरूष आणि १०७ महिला खेळाडूंचा समावेश आहे. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण २६ पदके जिंकली होती. यातील सर्वाधिक पदके भारताने शूटिंगमध्ये मिळवली होती. मात्र, यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत शुटिंग खेळाचा समावेश करण्यात आलेला नाही.

  • राष्ट्रकुल २०२२ स्पर्धा (Commonwealth Games 2022) तोंडावर आली आहे. २८ जुलैपासून बर्मिंगहममध्ये या खेळांना सुरुवात होणार आहे. स्पर्धेत भारताचा २१५ सदस्यीय संघ सामील होणार आहे. यात १०८ पुरूष आणि १०७ महिला खेळाडूंचा समावेश आहे. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण २६ पदके जिंकली होती. यातील सर्वाधिक पदके भारताने शूटिंगमध्ये मिळवली होती. मात्र, यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत शुटिंग खेळाचा समावेश करण्यात आलेला नाही.
नीरज चोप्रा (भालाफेक) : भारताला नीराज चोप्राकडून (neeraj chopra) राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वाधिक आशा आहेत. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
(1 / 11)

निखत झरीन (बॉक्सिंग) : निखत झरीनने (Nikhat Zareen) मे महिन्यात वर्ल्ड बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ती पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणार असून तिच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.
(2 / 11)

मानिका बत्रा (टेबल टेनिस) : गेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत मनिका बत्राने (Manika batra) एकेरी बरोबरच महिला सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकले होते. तिने सर्व मिळून ४ पदके जिंकली होती. आता पुन्हा एकदा तिच्याकडून पदकांची अपेक्षा आहे.
(3 / 11)

पी. व्ही, सिंधू (बॅडमिंटन) : भारताची फुलराणी पी. व्ही. सिंधूने (pv sibdhu) प्रत्येक मोठ्या स्पर्धेत पदक पटकावले आहे. तिने राष्ट्रकुल स्पर्धेत देखील सुवर्ण पदक जिंकले होते. दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूकडून यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये देखील मोठी अपेक्षा असेल.
(4 / 11)

रवी कुमार दहिया (कुस्ती) : ऑलिम्पिक पदक विजेत्या रवी कुमार दहिया (ravi kumar dahiya) ५७ किलो वजनी गटात राष्ट्रकुल स्पर्धेत उतरणार आहे. तो या वजनी गटात सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार आहे. त्याने एशियन चॅम्पियनशिपमध्ये देखील सुवर्ण पदक जिंकले होते.
(5 / 11)

मीराबाई चानू (वेट लिफ्टिंग) : ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूकडे (Chanu Saikhom Mirabai)  सध्या दोन राष्ट्रकुल पदके आहेत. तिने २०१४ मध्ये रौप्य आणि २०१८ मध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिच्याकडून भारताला भरपूर अपेक्षा आहेत.
(6 / 11)

बजरंग पुनिया (कुस्ती) : बजरंग पुनियाने (Bajrang Punia) देखील ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली होती. राष्टकुल स्पर्धेत त्याने गेल्यावेळी सुवर्णपदक पटकावले होते. आता पुन्हा एकदा तो सुवर्ण पदकाचा दावेदार आहे.
(7 / 11)

अमित पांघल (बॉक्सिंग) : २०१८ च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत फायनलमध्ये अमित पांघल (amit panghal)  इंग्लंडच्या बॉक्सरकडून थोडक्यात पराभूत झाला होता. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. यावेळी त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
(8 / 11)

लक्ष्य सेन (बॅडमिंटन) : २० वर्षीय लक्ष्य (lakshya sen) राष्टकुल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत आहे. तो थॉमस कपमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. त्याच्या नावावर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही पदक आहे.
(9 / 11)

विनेश फोगाट (कुस्ती) : ५३ किलो वजनी गटात विनेश फोगाट (vinesh phogat) सुवर्ण पदकाची दावेदार मानली जात आहे. तिने यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण पदके जिंकली आहेत. याचबरोबर तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देखील पदक जिंकले आहे.
(10 / 11)

Commonwealth Games 2022
(11 / 11)
Commonwealth Games 2022

    शेअर करा