मराठी बातम्या  /  धर्म  /  Chaitra Navratri 2023 : कल्याणकारी कवच आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ

Chaitra Navratri 2023 : कल्याणकारी कवच आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ

Mar 27, 2023, 02:41 PM IST

  • Durga Saptashati Paath : मार्कंडेय ऋषींनी रचलेला हा दुर्गा सप्तशी पाठ अत्यंत फलदायी आणि कल्याणकारी मानला गेला आहे.दुर्गा सप्तशतीमध्ये दुर्गा देवीने महिषासुराच्या केलेल्या वधाचे वर्णन केले आहे.

दुर्गा माता (हिंदुस्तान टाइम्स)

Durga Saptashati Paath : मार्कंडेय ऋषींनी रचलेला हा दुर्गा सप्तशी पाठ अत्यंत फलदायी आणि कल्याणकारी मानला गेला आहे.दुर्गा सप्तशतीमध्ये दुर्गा देवीने महिषासुराच्या केलेल्या वधाचे वर्णन केले आहे.

  • Durga Saptashati Paath : मार्कंडेय ऋषींनी रचलेला हा दुर्गा सप्तशी पाठ अत्यंत फलदायी आणि कल्याणकारी मानला गेला आहे.दुर्गा सप्तशतीमध्ये दुर्गा देवीने महिषासुराच्या केलेल्या वधाचे वर्णन केले आहे.

चैत्र नवरात्र सध्या भक्तीभावात सुरू आहे. चैत्र नवरात्रीचे सहा दिवस झाले असून आता सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस बाकी आहेत. अशात माता दुर्गेच्या विविध रुपांची तर आपण पूजा करतच आहोत, त्याशिवाय सप्तशती पाठ म्हटल्यास मिळणारं फळ हे कित्येक पटींनी जास्त असतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. काय आहे दुर्गा सप्तशतीपाठ हे आपण जाणून घेणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Chardham Yatra 2024 : चारधाममध्ये कोणत्या देवी-देवतांची पूजा केली जाते? जाणून घ्या

Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला करा हे उपाय, सर्व अडचणी दूर होतील

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, नाहीतर आयुष्यभर घरात दारिद्र्य राहील

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे काय?

मार्कंडेय ऋषींनी रचलेला हा दुर्गा सप्तशी पाठ अत्यंत फलदायी आणि कल्याणकारी मानला गेला आहे.दुर्गा सप्तशतीमध्ये दुर्गा देवीने महिषासुराच्या केलेल्या वधाचे वर्णन केले आहे. यातला प्रत्येक श्लोक हा महामंत्र म्हणून पाहिला गेला आहे. यात १३ अध्याय आणि एकंदरीत ७०० श्लोक आहेत. या श्लोकांचे तीन भाग केले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार दुर्गा सप्तशती पठण केल्याने सिद्धी प्राप्त होऊ शकते असं सांगितलं जातं.

दुर्गा सप्तशती मंत्र जपाचे नियम

सर्वप्रथम तुमच्या इच्छेनुसार मंत्र निवडा. रोज तीन जपमाळ मंत्रांचा जप करा. सप्तशतीच्या पाठापूर्वी उत्कीलन मंत्राचा जप अवश्य करा. त्यानंतर कवच, अर्गला आणि कीलक पाठ करता येईल. लाल वस्त्र परिधान करून त्याचे पठण करा. लाल चंदन किंवा रुद्राक्ष जपमाळाने मंत्र जप करावा.

दुर्गा सप्तशतीचे पठण कसे करावे?

नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पठण करणे उत्तम मानले जाते. आईसमोर तुपाचा दिवा लावावा. त्यांना फुले अर्पण करा. यानंतर सप्तशती पठण करावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा