मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  अफगाणिस्तानातल्या भूकंपात एक हजार लोकं ठार, पाहा भूकंपाचे भयानक फोटो

अफगाणिस्तानातल्या भूकंपात एक हजार लोकं ठार, पाहा भूकंपाचे भयानक फोटो

Jun 23, 2022, 02:34 PMIST

बुधवारी अफगाणिस्तानच्या पूर्वेकडे झालेल्या भूकंपाने एक हजारपेक्षाही जास्त लोकं मृत्यूमुखी पडले होते. तर हजारो लोकं जखमी झाली आहेत. लोकांना एअर लिफ्ट करण्यात आलं आहे. ६.१ रिश्टर स्केल क्षमतेच्या या भूकंपाचे धक्के पाकिस्तानातल्या इस्लामाबादच्या काही भागातही बसले होते.

बुधवारी अफगाणिस्तानच्या पूर्वेकडे झालेल्या भूकंपाने एक हजारपेक्षाही जास्त लोकं मृत्यूमुखी पडले होते. तर हजारो लोकं जखमी झाली आहेत. लोकांना एअर लिफ्ट करण्यात आलं आहे. ६.१ रिश्टर स्केल क्षमतेच्या या भूकंपाचे धक्के पाकिस्तानातल्या इस्लामाबादच्या काही भागातही बसले होते.

बख्तर न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात २८० व्यक्तींचा मृत्यू झाला तर शेकडो नागरिक जखमी झालेत असं सांगण्यात आलं होतं.
(1 / 5)
बख्तर न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात २८० व्यक्तींचा मृत्यू झाला तर शेकडो नागरिक जखमी झालेत असं सांगण्यात आलं होतं.(TOLO news)
या भूकंपाची ही दृष्य सोशल मिडियावर वेगानं व्हायरल झाली. हे त्यातलं एक बोलकं दृष्य.
(2 / 5)
या भूकंपाची ही दृष्य सोशल मिडियावर वेगानं व्हायरल झाली. हे त्यातलं एक बोलकं दृष्य.(TOLO news)
बख्तर न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार तालिबानने लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत तर मृतांचा आकडा वाढू शकतो असं म्हटलं होतं.
(3 / 5)
बख्तर न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार तालिबानने लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत तर मृतांचा आकडा वाढू शकतो असं म्हटलं होतं.(Twitter/@BakhtarNA)
इथल्या दगडी घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. त्यातून उरलेल्या वस्तू आपल्या हाती लागाव्यात म्हणून लोकांची धावपळ सुरू झाली होती. पक्तिका प्रांतात या भुकंपाचे मोठे धक्के बसले.
(4 / 5)
इथल्या दगडी घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. त्यातून उरलेल्या वस्तू आपल्या हाती लागाव्यात म्हणून लोकांची धावपळ सुरू झाली होती. पक्तिका प्रांतात या भुकंपाचे मोठे धक्के बसले.(TOLO news)
जखमींच्या मदतीसाठी काबूल आणि इतर भागातून रुग्णवाहिका, वैद्यकीय सुवीधा आणि हेलिकॉप्टर सुविधा ताबडतोब पोहोचवण्यात आल्याचं इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. 
(5 / 5)
जखमींच्या मदतीसाठी काबूल आणि इतर भागातून रुग्णवाहिका, वैद्यकीय सुवीधा आणि हेलिकॉप्टर सुविधा ताबडतोब पोहोचवण्यात आल्याचं इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. (Twitter/@BakhtarNA)

    शेअर करा