मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Army Women Agniveer Recruitment: आर्मीमध्ये महिला अग्निवीरांच्या भरतीसाठी रजिस्ट्रेशन सुरू

Army Women Agniveer Recruitment: आर्मीमध्ये महिला अग्निवीरांच्या भरतीसाठी रजिस्ट्रेशन सुरू

Aug 10, 2022, 10:52 PM IST

    • Indian Army Agniveer Women Recruitment 2022 : इंडियन आर्मी अग्निपथ अग्निवीर फीमेल भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. आर्मीमध्ये महिला अग्निवीरांची भरती मिलिट्री पोलिसमध्ये केली जाईल.
महिला अग्निवीरांच्या भरतीसाठी रजिस्ट्रेशन सुरू

Indian Army Agniveer Women Recruitment 2022 :इंडियन आर्मी अग्निपथ अग्निवीर फीमेलभरतीचेनोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे.आर्मीमध्येमहिला अग्निवीरांची भरतीमिलिट्रीपोलिसमध्ये केली जाईल.

    • Indian Army Agniveer Women Recruitment 2022 : इंडियन आर्मी अग्निपथ अग्निवीर फीमेल भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. आर्मीमध्ये महिला अग्निवीरांची भरती मिलिट्री पोलिसमध्ये केली जाईल.

Indian Army Agniveer Women Recruitment 2022 : इंडियन आर्मी अग्निपथ अग्निवीर फीमेल भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आर्मीमध्ये महिला अग्निवीरांची भरती मिलिट्री पोलीस (Women Military Police Recruitment 2022 ) मध्ये केली जाईल. 

ट्रेंडिंग न्यूज

Haryana News : हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात! ३ अपक्ष आमदार काँग्रेसच्या गोटात, सरकारला धोका किती?

पतीला म्हटलं गुडबाय अन् नंतर महिलेने ३ वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात मारली गोळी, काय होतं कारण?

Punjab Haryana High Court : वृद्ध सासूबरोबर राहण्यास सुनेचा नकार, हायकोर्टानं मंजूर केला नवऱ्याचा घटस्फोटाचा अर्ज

israel hamas war : इस्रायलनं राफामध्ये हल्ल्याची तयारी करताच हमासनं टेकले गुडघे! म्हणाले, युद्धबंदीसाठी तयार

जॉइन इंडियन आर्मी वेबसाइट वर म्हटले आहे की, मिलिट्री पोलिसात महिला अग्नवीरांची भरती मेळाव्याचे नोटिफिकेशन संबंधित मुख्यालय आरटीजी झोन जारी करतील. बंगळुरू  मुख्यालय आरटीजी झोन बंगलुरुमध्ये एक नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत मानेकशॉ परेड ग्राउंडवर भरती मेळावा आयोजित केला जाईल. बंगलुरु मुख्यालय आरटीजी विभागाच्या या भरती मेळाव्यात कर्नाटक, केरळ, लक्षद्वीपमधील तरुणी सामील होऊ शकतात. या भरती प्रक्रियेसाठी  ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबर २०२२ आहे. यासाठी उमेदवारांना वेबसाइट www.Joinindianarmy.nic.in पर ऑनलाइन रजिस्ट्रेशन  करणे अनिवार्य आहे. या मेळाव्यासाठी प्रवेशपत्र संबंधित उमेदवारांच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर १२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पाठवण्यात येतील. 

हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि चंडीगडच्या महिला उमेदवारांसाठी सात ते ११ नोव्हेंबर दरम्यान भरती मेळावा आयोजित केला जाईल. यासाठी ऑनलाइन नोंदणीकरण ९ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. सात सप्टेंबरपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिला भरतीसाठी पात्र ठरतील. उमेदवार पाच ऑक्टोबरपासून प्रवेश पत्र भारतीय लष्कराच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतील. ज्या महिलांचे वय १७ ते २३ वर्ष आहे व ज्यांनी १० वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्या अग्निवीर परीक्षेसाठी पात्र आहेत. 

मिलिट्री पोलीसमध्ये महिला अग्निवीरांची भरती -  
पात्रता – कमीत कमी ४५ टक्के गुणांसह १० वी पास प्रत्येक विषयात कमीत कमी ३३ टक्के मार्क आवश्यक.

वयोमर्यादा – कमीत कमी १७ वर्ष कमाल २३ वर्ष 

उंची - १६२ सेंमी. 

अग्निवीर भरतीसाठी शारीरिक चाचणीसाठी ग्रुप-१ नुसार साडे ७ मिनिटात १.६ किमी धावणे आवश्यक आहे. ग्रुप-२ नुसार ८ मिनिटात १.६ किमी धावणे आवश्यक आहे. १० फूट लांब उडी व ३ फूट उंच उडी मारणे आवश्यक आहे. 

पुरुष अग्निवीरांप्रमाणे महिला अग्निवीरांनाही चार वर्षासाठी भरती करून घेण्यात येईल.  चार वर्षानंतर केवळ २५ टक्के महिला अग्निवीरांना मिलिट्री पोलिसात कायम केले जाईल. 

मुख्यालय  अंतर्गत येणारी राज्ये 
अंबाला हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली
बंगळुरू-कर्नाटक आणि केरळ
चेन्नई - तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा
दानापूर बिहार आणि झारखंड
जबलपूरमध्य प्रदेश आणि छत्तीसगड
जयपूर राजस्थानराजस्थान
जालंधर पंजाब, जम्मू आणि कश्मीर
कोलकाता पश्चिम बंगाल आणि ओडिशा
लखनौ उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड
पुणे महाराष्ट्र आणि गुजरात
शिलांग ईशान्येकडील राज्ये