मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  काँग्रेसच्या महिला आमदारावर जीवघेणा हल्ला, भर कार्यक्रमात व्यासपीठावरच चाकूने केले सपासप वार

काँग्रेसच्या महिला आमदारावर जीवघेणा हल्ला, भर कार्यक्रमात व्यासपीठावरच चाकूने केले सपासप वार

Aug 21, 2023, 04:18 PM IST

  • Attack on Woman congress mla : महिला आमदारावर चाकूने हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  छन्नी चंदू साहू असे हल्ला झालेल्या महिला आमदाराचे नाव आहे.

Attack on Woman congress mla

Attack on Woman congress mla : महिला आमदारावर चाकूने हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. छन्नी चंदू साहू असे हल्ला झालेल्या महिला आमदाराचे नाव आहे.

  • Attack on Woman congress mla : महिला आमदारावर चाकूने हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  छन्नी चंदू साहू असे हल्ला झालेल्या महिला आमदाराचे नाव आहे.

छत्तीसगडमध्ये महिला आमदारावर चाकूने हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. छन्नी चंदू साहू असे हल्ला झालेल्या महिला आमदाराचे नाव आहे. दारूच्या नशेत धुंद व्यक्तीने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. ही घटना छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील खुज्जी विधानसभा मतदारसंघात घडली. खिलेश्वर असे हल्लेखोराचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

High court News : महिलांना स्वीटी आणि बेबी म्हणणं लैंगिक टिप्पणी? हायकोर्टानं ओढली लक्ष्मणरेखा

Firecracker Factory fire : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू

Hindu Population : भारतात हिंदूच्या लोकसंख्येत गतीने घट तर मुस्लिम लोकसंख्या वृद्धी, वाचा अन्य अल्पसंख्यांकांची स्थिती

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

महिला आमदाररविवारी सायंकाळी राजनांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोधरा गावात एका कार्यक्रमासाठी गेली असता त्यांच्यावर हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार साहू व्यासपीठावर बसली होती. त्यावेळी अनाचक एक मद्यधुंद व्यक्ती व्यासपीठावर आली व त्याने महिला आमदारावर चाकूने हल्ला केला.

आमदार छन्नी साहू खुज्जी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आहेत. छन्नी साहू जोधरा गावामध्ये भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेल्या लोकांची गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत हल्लेखोर व्यासपीठावर पोहोचला व त्याने आमदारावर हल्ला केला. या हल्ल्यात आमदार साहू किरकोळ जखमी झाल्या त्यांना प्राथमिक उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले.

आमदार छन्नी साहू यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडून जमावाने त्याला मारहाण केली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पीएसओ आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतले. हल्लेखोर आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.

 

या हल्ल्यामध्ये आमदारांच्या हाताला दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळावर एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले.

विभाग